उदयनराजेही कमळाच्या प्रेमात…! नव्या प्रवासाचा मुहूर्त ठरला

मुंबई |  राष्ट्रवादीचे सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आपला भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत पंतप्रधान मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ते शनिवार 14 सप्टेंबर तारखेला भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

एवढेच नाहीतर भाजपात प्रवेश केल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 सप्टेंबरला उदयनराजे हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सहभागी होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

सकाळीच खासदार उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या पुण्यातील निवास्थानी जाऊन भेट घेतली होती. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची देखील उपस्थिती होती. या बैठकीनंतर उदयनराजेंच्या भाजप प्रवेशांच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असं बोललं जात होतं.

उदयनराजे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचे मुद्दे आणि रणनीतीवर चर्चा करण्यात आली. उदयनराजेंची कोणतीही नाराजी नाही. ते पक्षातच असून बाहेर जाण्याची चर्चा झालेले नाही. ते कधीही भाजपच्या प्रवेशावर बोलले नाहीत, असं धनंजय मुंडेनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं होतं.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी आणि मुख्यमंत्री उदयनराजेंच्या संपर्कात असून ते भाजपात येतील याबद्दल आशावादी असल्याचं सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या-