“माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा”

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान दिवंगत पी. व्ही. नरसिंहराव यांना अर्थव्यवस्था, काश्मीर आणि राम मंदिर या मुद्द्यांवरुन प्रजासत्ताक दिनी केंद्र सरकारने ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, असं मतं सुब्रह्मण्यम स्वामी यांनी व्यक्त केलं आहे.

नरसिंहराव यांनी फक्त अर्थव्यवस्था सुधारली नाही तर संसदेत काश्मीर मुद्द्यावरु प्रस्ताव पारित केला आहे, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहे.

जर वादग्रस्त जमिनीवर पहिल्यांदा मंदिर होते. त्यानंतर त्याठिकाणी बाबरी मश्जिद बांधण्यात आलं तर सरकार हिंदूंना जामीन देईल, असं सुब्रह्मण्यम स्वामी सर्वोच्च न्यायालयात बोलताना म्हणाले आहेत.

नरसिंहराव यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्द्यावा, अशी मागणी यापूर्वी तेलंगणा सरकारनेही केंद्र सरकारकडे केली होती.

दरम्यान, 25 जुलै 1991 रोजी त्यांनी सादर कलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात बदललेल्या अर्थव्यवस्थेचे दर्शन घडते. तो दिवस देशात आर्थिक परिवर्तनाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. 

महत्त्वाच्या बातम्या –