कौन बनेगा करोडपतीच्या ११ व्या सिझनला मिळाला हा करोडपती!

मुंबई : सोनी टीव्हीवरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’चा सध्या 11 वा सीझन सुरु आहे. आतापर्यंत अनेक स्पर्धकांनी या शोमध्ये हजेरी लावली. मात्र अद्याप या शोमध्ये या सीझनचा पहिला करोपती पाहायला मिळाला नव्हता.

KBC-11 ला त्यांचा पहिला-वहिला करोडपती मिळाला आहे. बिहारमधील ढोंगरा या छोट्याशा गावातून आलेल्या सनोज राजनं एक कोटीची रक्कम जिंकत नवा इतिहास रचला आहे.

सोनी टीव्हीनं मंगळवारी त्यांच्या ऑफिशियल अकाउंटवरुन आगामी एपिसोडचा एक प्रोमो पोस्ट केला. ज्यात सनोज राज 15 व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देत एक कोटी रुपये जिंकल्याचं दिसत आहे.

सोनी चॅनलनं पोस्ट केलेल्या या प्रोमोनुसार सिनोद आता 7 कोटींच्या प्रश्नासाठी हॉट सीटवर बसलेलला पाहायला मिळत आहे. येत्या गुरुवार आणि शुक्रवारी सोनी टीव्हीवर सनोजचा हा एपिसोड प्रसारित होणार आहे.

मुळचा बिहारचा असलेल्या सनोज राजनं याआधी कधीच शहर पाहिलं नव्हतं. त्याचे वडील रामजनम शर्मा एक सर्वसाधारण शेतकरी आहे. सिनोजनं जहानाबादमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानं वर्धमान कॉलेजमधून बीटेकची पदवी घेतली आहे. 

महत्वाच्या बातमी-