प्रेमी युगलाला मारहाण करणारे सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जालना |  चार जणांच्या टोळक्याने एका प्रेमी युगलाला मारहाण आणि मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यात घडला होता. या प्रकरणी जालना पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे.

तलावाशेजारी बसलेल्या प्रेमी युगलाला काही जणांनी पकडून मारहाण केली होती. तसेच तरुणीची काँलर पकडून तिचा विनयभंग केला होता. या घटनेवर सर्व स्तरातून संताप व्यक्त होत असून आरोपींवर कारवाई व्हाही, अशी मागणी होत होती.

संबंधित घटनेचा व्हिडीओ दोन दिवसांपासून व्हायरल होत होता. मात्र, तरीही जालना पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरताच पोलिसांनी चक्र फिरवली आणि सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहेत.

दरम्यान, माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की, या घटनेचा व्हिडिओ आपण कुणालाही फॉरवर्ड करु नये. आपल्याकडे तो आला असेल तर तो डिलिट करावा. मी स्वतः गृहखाते व सायबर क्राईम सेलला हा व्हिडीओ डिलिट करावा अशी विनंती केली आहे, असं सुप्रिया सुळे या प्रकरणावर म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

-विरोधकांना गाडण्यात माझी पी. एचडी; म्हणूनच पक्षानं मला दिल्लीत बोलावलं- पंकजा मुंडे

-निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांच्या फाशीला स्थगिती

-प्रेमी युगलाला मारहाणीची घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी; सुप्रिया सुळे संतापल्या

-राज ठाकरेंचं विद्युत आयोगाला पत्र; बेस्टच्या वीज दरवाढीवर मनसेचा आक्षेप

-रत्नागिरीच्या जिल्हा परिषद शाळांच्या गॅदरिंगमध्ये ‘आयटम साँग’वर बंदी