विरोधकांना गाडण्यात माझी पी. एचडी; म्हणूनच पक्षानं मला दिल्लीत बोलावलं- पंकजा मुंडे

नवी दिल्ली |  दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून महाराष्ट्र भाजपचे अनेक नेते दिल्लीत प्रचारासाठी गेले आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यासुद्धा दिल्लीत प्रचाराला आल्या असून यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

विरोधकांना गाडण्यात आमची पी. एचडी आहे, म्हणूनच दिल्लीच्या प्रचाराला आले आहे, असं त्या म्हणाल्या आहेत. दिल्लीतलं झाडूवालं सरकार यावेळी दिल्लीतून हटवा. दिल्ली या देशाचं मुकुट आहे. ते मुकुट नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर ठेवा, असंही त्या म्हणाल्या आहेत.

मला दिल्लीत जास्त कुणी ओळखत नाही. मी दिल्लीत लोकप्रिय नाही. पण लोक मला माझ्या वडिलांच्या नावाने ओळखतात. विरोधकांना गाडण्यात आमची पी. एचडी आहे. म्हणूनच अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांनी आम्हाला दिल्लीच्या प्रचाराला बोलावलं आहे, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे या दिल्लीत प्रचाराला दाखल झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांच्या फाशीला स्थगिती

-प्रेमी युगलाला मारहाणीची घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी; सुप्रिया सुळे संतापल्या

-राज ठाकरेंचं विद्युत आयोगाला पत्र; बेस्टच्या वीज दरवाढीवर मनसेचा आक्षेप

-रत्नागिरीच्या जिल्हा परिषद शाळांच्या गॅदरिंगमध्ये ‘आयटम साँग’वर बंदी

-“मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आपण लढा देणार”