‘किस घेणं बंद करा’; आरोग्यमंत्र्यांचे देशातील नागरिकांना आदेश

पॅरिस | जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. प्रत्येक देशातील सरकार आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहेत. फ्रान्सनेही आपल्या नागरिकांसाठी काही आदेश दिले आहेत. यामध्ये गालावर किस करणं बंद करावं, अशा सुचना फ्रान्सचे आरोग्य मंत्री ओलेव्हियर वेरन यांनी दिल्या आहेत.

भेटताना दोन्ही गालावर किस करण्याची फ्रान्समध्ये प्रथा आहे. पण ही प्रथा बंद करावी यासाठी फ्रान्स सरकारने सावधानता बाळगण्याचं आवाहन केलं आहे. तसेच पाच हजार पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यासाठीही बंदी घातली आहे.

फ्रान्स सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे. त्यामुळे नागरिकांवर घालण्यात आलेले निर्बंध हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत. जास्त काळ हे निर्बंध राहणार नाहीत, असंही फ्रान्सच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, जमावाला बंदी असल्यामुळे पॅरिस हाफ मॅराथॉनही रद्द करण्याची वेळ आली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-अहो, हे सरकार उलट्या दिशेने का जात आहे?; विनायक मेटेंचा सरकारला सवाल

-लक्षात ठेवा, प. बंगालमध्ये राहणारा प्रत्येक बांगलादेशी भारतीय नागरिक आहे- ममता बॅनर्जी

-लक्षात ठेवा, प. बंगालमध्ये राहणारा प्रत्येक बांगलादेशी भारतीय नागरिक आहे- ममता बॅनर्जी

-सावधान…. भारतात कोरोणाग्रस्तांची संख्या 28 वर; केंद्रिय आरोग्यमंत्र्यांची माहिती

-भाजपचे 14 आमदार आमच्या संपर्कात पण…; जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट