देश मनोरंजन

लग्न ते रफींसोबतच्या वादापर्यंत; वाचा लता मंगेशकर यांच्याबद्दल कधीही न वाचलेल्या गोष्टी

आज भारताची गान कोकिळा आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचा वाढदिवस आहे. लताताई आज त्यांचा ९१ वा वाढदिवस साजरी करत आहे. संगीत शब्द उच्चारल्यावर आपल्या सर्वांसमोर पहिले नाव तसेच एक मधुर आवाज आपल्या कानांवर हमखास येतो, तो म्हणजे लता मंगेशकर यांचा.

संगीताने जगातील अनेकांचे हृदय लताताईंनी जिंकले. पण लताताई यांच्या आयुष्यात असे काही प्रश्न आहे, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी मध्यप्रदेशातील इंदोरमध्ये झाला.

लताताईंचे वडील दीनानाथ मंगेशकर हे मराठी तर आई शेवनती या गुजराती होत्या. त्यांच्या घरात लहानपणापासूनच संगीताचे वातावरण होते. त्यांचे वडील मराठी संगीतकार होते. १९४२ मध्ये लताताई जेव्हा १३ वर्षांच्या होत्या, तेव्हाच त्यांच्या डोक्यावरील बाबांचा हात कायमचा गेला.

त्यांच्या वडिलांच्या मृ.त्यूनंतर मास्टर विनायक (विनायक दामोदर कर्नाटकी) यांनी लताताईंचे करिअर सांभाळले. मास्टर विनायक यांच्या माध्यमातून लताताईंना ‘किती हासिल’ या चित्रपटात पहिल्यांदा गाणं गाण्याची संधी मिळाली. पण नंतर हे गाणं काढून टाकण्यात आले. त्याच वर्षी लताताईंना ‘पहली मंगलमौर’ या चित्रपटात अभिनय करण्याची संधी प्राप्त झाली.

या चित्रपटात त्यांनी स्नेहप्रभा प्रधान यांच्या छोट्या बहिणीची भूमिका केली होती. त्यानंतर १९४३ मध्ये माझे बाळ आणि चिमुकला संसार, १९४४ मध्ये गजभाऊ, १९४५ मध्ये बडी माँ, १९४६ मध्ये जीवन यात्रा, १९४८ मध्ये मांद आणि १९५२ मध्ये छत्रपती शिवाजी अशा विविध चित्रपटांमध्ये लताताईंनी छोट्या-मोठ्या भूमिका केल्या.

लताताईंनी जवळपास सर्व प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकांसोबत गाणं गायले आहे. मीडियाच्या अहवालानुसार, लताताईंनी आतापर्यंत एक हजारपेक्षा अधिक चित्रपटांसाठी गाणी गायली आहे. त्यांनी ३६ भाषांमध्ये तब्बल ५० हजारांपेक्षा अधिक गाणी गायली आहे.

लताताईंच्या जीवनाबद्दल एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतोच, तो म्हणजे लताताईंनी शेवटपर्यंत लग्न का केलं नाही ? लताताई यांच्या वडिलांच्या मृ.त्यूनंतर त्यांच्यावर लहान भाऊ-बहीण सांभाळण्याची जबाबदारी आली होती. यामुळे त्यांनी आजीवन लग्न केले नाही.

काही दशकांपूर्वी त्यांच्यात आणि मोहम्मद रफी यांच्यात वाद झाले होते. लताताईंनी प्रस्ताव ठेवला होता की, संगीत कंपन्यांच्या रेकॉर्ड विक्रीतील काही पैसा गायकांना द्यायला पाहिजे. पण या मुद्दयावर रफी यांचे वेगळेच मत होते, त्यामुळे हा वाद त्यांच्यात खूप काळ चालला आणि त्या काळात त्यांनी सोबत गाणंही गायलं नाही. पण १९६७ मध्ये त्यांच्यातील संबंध सामान्य झाले.

महत्त्वाच्या बातम्या-

निकोलस पूरनने असा डेंजर षटकार वाचवला, हे पाहून जॉन्टी रोड्सनं उठून…

‘तू करण जोहरला अडकव, आम्ही तुला सोडून देऊ’; पाहा कुणी केला ‘हा’ धक्कादायक आ.रोप

राहुल तेवतियाने पाच चेंडूत पाच षटकार मारले, युवराज सिंह घाबरून म्हणाला…

‘मी कंगनाला ‘त्या’ गोष्टीसाठी बळजबरी केली असली तरी…’; अनुराग कश्यपचा धक्कादायक खुलासा!

‘मला लवकर न्याय मिळाला नाही तर मी…’; अनुराग कश्यपवर लैं.गिक छ.ळाचा आ.रोप करणाऱ्या पायलचा ईशारा