‘आम्ही 1993 पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये…’; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यावर गंभीर आरोप

मुंबई | भाजप आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला आहे. 1993 पासून गणेश नाईक यांनी महिलेला लग्नाचं आमिष दिलं आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असा गंभीर आरोप गणेश नाईक यांच्यावर करण्यात आलाय.

पीडित महिला गणेश नाईक यांच्यासोबत 1993 पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. या संबंधांमधून त्यांना 15 वर्षांचा मुलगा देखील आहे.

ज्यावेळेस गणेश नाईक यांच्याकडे लग्नाची मागणी केली तेव्हा जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप पीडितेने केला आहे.

पीडितेने त्यांचे वैवाहिक अधिकार आणि मुलासाठी पितृत्वाचा अधिकार मागितल्यावर धमकी देत असल्याची तक्रार महिलेने राज्य महिला आयोगाकडे केली.

राज्य महिला आयोगाने ट्विटर हँडेलवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्य महिला आयोगाने त्याची दखल घेवून 48 तासांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश नवी मुंबई पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे गणेश नाईक अडचणीत येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्राप्त झालेल्या तक्रारीची राज्य महिला आयोगाने तात्काळ गंभीर दखल घेतली. तसेच बेलापूर पोलीस आयुक्तांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

पाहा ट्विट-  

महत्त्वाच्या बातम्या- 

Aryan khan : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीची मोठी कारवाई!

बेपत्ता ‘सोमय्या’ मुंबईत दाखल; कोर्टाकडून दिलासा मिळताच शिवसेनेवर बरसले

शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणात धक्कादायक माहिती समोर!

काय सांगता! रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोडणार?

“संजय राऊत म्हणजे राष्ट्रवादीचा भोंगा, उद्धव ठाकरेंनी कधीच…”