संस्कृत बोला अन् डायबिटीस टाळा!; भाजप खासदाराचा अजब दावा

नवी दिल्ली | लोकसभेत केंद्रीय संस्कृत विद्यापीठ विधेयक 2019 वर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान भाजपचे खासदार गणेश सिंग यांनी अजब दावा केला. यामुळे ते चर्चेचा विषय ठरले आहेत.

अमेरिकेतील एका शैक्षणिक संस्थेच्या संशोधनानुसार नियमितपणे संस्कृत बोलल्यास मज्जासंस्थेस चालना मिळते. तसंच यामुळे मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलही दूर राहतो, असा दावा सिंग यांनी केला आहे.

जर संगणक प्रोग्रामिंग संस्कृतमध्ये केलं गेलं तर ते सध्याच्या प्रणालीपेक्षा अधिक परिणामकारक आणि कार्यक्षम ठरेल, असं अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने केलेल्या कथित संशोधनाचा हवाला देत सिंग यांनी म्हटलं.

देशातील 97 टक्के भाषा या संस्कृतवर आधारित आहेत आणि त्यामध्ये काही इस्लामिक भाषांचाही समावेश होतो. या भाषांचं मूळ हे संस्कृतमध्येच आहे, असंही गणेश सिंग यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-