जालन्यात टोळक्याची प्रेमी युगुलाला मारहाण; पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय??

जालना |  एका प्रेमी युगुलाला मारहाण करतानाचा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. हा व्हीडिओ जालन्यातला असल्याचं समोर येतंय. या व्हीडिओमध्ये मुलीचा विनयभंग होत असल्याचं दिसतंय. चार जणांच्या टोळक्याने त्या प्रेमी युगुलाला मारहाण करत मुलीचा विनयभंग केलाय. त्यामुळे मुलींचीं सुरक्षितता आणि त्यांच्यासाठी निर्भय वातावरण या चर्चा केवळ चर्चाच बनून राहिल्याचं पुन्हा सिद्ध झालंय.

जालन्याच्या महाविद्यालयातले हे तरूण-तरूणी आहेत. दोघे जणं भेटण्यासाठी तळ्याकाठी आले होते. परंतू टोळक्यातील काही तरूणांच्या हीच गोष्ट नजरेला पडल्यानंतर त्यांनी संबंधित तरूण-तरूणीला मारहाण केली तसंच मुलीचा विनयभंग करण्याचा देखील प्रयत्न केला.

व्हायरल झालेल्या व्हीडिओची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून संबंधितांवर योग्य ती कारवाई करणार असल्याचं आश्वासन जालना पोलिस अधिक्षकांनी दिलं आहे.

गृहमंत्री अमिल देशमुख यांनीदेखील प्रकरणाची दखल घेतली असून आम्ही मुलीला न्याय देण्यासाठी तत्पर आहोत. मुख्यमंत्र्यांनी देखील प्रकरणाची दखल घेतली आहे. जालना पोलिस अधिक्षकांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-आम्हाला देशभक्ती पाहिजे… दारूभक्ती नको- डॉ. अभय बंग

-कोणाच्या अन्नात विष कालवणे हे आमचे संस्कार नाहीत- येवले चहा

-पंतप्रधान मोदी भगवान राम तर अमित शहा हनुमान; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

-गोळी मारा म्हणणाऱ्या अनुराग ठाकुरांना अटक करा; #ArrestAnuragThakur ट्वीटरवर ट्रेंड

-भाजपने नेमलेले 19 साखर कारखान्यांवरचे संचालक हटवले; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय