आम्हाला देशभक्ती पाहिजे… दारूभक्ती नको- डॉ. अभय बंग

मुंबई | आम्हाला देशभक्ती पाहिजे… दारूभक्ती नको, असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केलं आहे. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या सेवाग्रामधल्या कार्यक्रमात बंग बोलत होते.

आम्हाला देशभक्ती पाहिजे… दारूभक्ती नको. स्त्री मुक्ती पाहिजे असेल तर पहिल्यांदा दारूमुक्ती झाली पाहिजे. जोपर्यंत दारू आहे तोपर्यंत समाज आणि स्त्री असुरक्षित आहे, असं बंग म्हणाले.

महाराष्ट्र शासनाने दारूबंदी असलेल्या 3 जिल्ह्यांचा झोन तयार करावा. मुक्तीपथ पॅटर्नने तंबाखू आणि दारूबंदीची प्रभावी दारूबंदी करावी, असंही ते म्हणाले आहेत.

जिथं दारूबंदी आहे तिथं स्त्रियांवर कमी अत्याचार होतात. दारूबंदी हटवल्यास अत्याचार वाढतील. शासनाने दारूबंदीसाठी प्रयत्न करावेत, असंही ते म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-कोणाच्या अन्नात विष कालवणे हे आमचे संस्कार नाहीत- येवले चहा

-पंतप्रधान मोदी भगवान राम तर अमित शहा हनुमान; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

-गोळी मारा म्हणणाऱ्या अनुराग ठाकुरांना अटक करा; #ArrestAnuragThakur ट्वीटरवर ट्रेंड

-भाजपने नेमलेले 19 साखर कारखान्यांवरचे संचालक हटवले; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

-भाजपचे नेतेच गोळी मारा म्हणत असतील तर हे होणारच; प्रियांका गांधींचं टीकास्त्र