गॅस सिलेंडरवर आता 300 रुपयांची सूट मिळणार! वाचा काय आहे ही भन्नाट योजना?

नवी दिल्ली | देशभरात करोडो लोकांच्या घरामध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी एलपीजी सिलेंडरचा वापर केला जातो. मात्र, अलीकडे याच गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडले आहेत. घरगुती गॅस सिलेंडरचे भाव अलीकडे सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर चालले आहेत.

मात्र, गॅस सिलेंडरचे भाव वाढत असले तरी देखील सिलेंडरवर मिळणाऱ्या सबसिडीमुळे सामान्य लोकांना दिलासा मिळत असतो. तुम्ही देखील तुमची सबसिडी चालू आहे की नाही, हे तपासून घ्या. आणि जर कोणत्या कागदपत्रांमुळे ती जमा होत नसेल तर त्याची आजच पुर्तता करुन घ्या. कारण आता सरकारने ही सबसिडी वाढली आहे.

प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत मिळणारी सबसिडी अगोदर 174.86 रुपये होती. मात्र ही सबसीडी वाढवून आता सरकारने  312.48 रुपये इतकी केली आहे. जर तुम्हाला ही सबसिडी मिळत असेल तर तुम्हाला घरगुती गॅस सिलिंडर केवळ 300 ते 400 रुपयांमध्ये मिळत आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस एलपीजी गॅसच्या चो.रीचं प्रमाण वाढतंच चाललं आहे. यालाच आळा घालण्यासाठी तेल कंपन्यांनी काही नवीन नियम लागू केले आहेत. याद्वारे ग्राहकांची ओळख पटवून सिलेंडर दिला जाणार आहे.

एलपीजी कंपनीनं आता Delivery Authentication Code ही नवीन पद्धत सुरु केली आहे. ज्याअंतर्गत ग्राहकांना सिलेंड.र घ्यायचा असल्यास मोबाईलवर ओटीपी मिळेल त्याची सत्यता पडताळल्याशिवाय ग्राहकांना सिलेंड.र मिळणार नाही.

यापूर्वी घरगुती गॅसचं फक्त बुकिंग केल्यास गॅस मिळत होता. मात्र, आता फक्त गॅसच्या बुकिंगवरच ही प्रक्रिया थांबणार नाही. त्यापुढेही गॅस सिलेंडर घेण्यासाठी आणखी प्रक्रिया करावी लागणार आहे. गॅस सिलेंडरचं बुकिंग झाल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर नंबरवर ओटीपी पाठवण्यात येईल.

हा ओटीपी ग्राहकांना सिलेंडर डिलिव्हरी करण्यासाठी जो व्यक्ती येईल त्याच्यासोबत शेअर करावा लागेल. ओटीपी मॅच झाल्यानंतरच ग्राहकांला सिलेंडर दिला जाईल. प्रथम DAC चा वापर देशातील 100 स्मार्ट शहरांमध्ये करण्यात येईल. सध्या दोन शहरांमध्ये हा पायलट प्रोजेक्ट चालू आहे.

महत्वाच्या बातम्या –

केवळ 5000 रुपये गुंतवा आणि लाखो रुपये कमवा! सरकार देखील करेल मदत

‘डेलकर यांच्या आत्मह.त्येसाठी कारणीभूत असलेल्यांना सोडणार नाही’; मुख्यमंत्र्यांचं डेलकरांच्या मुलाला आश्वासन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुण्यात 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार? अजित पवारांच मोठं पाऊल

सचिन वांझेंचा अंतरिम जामीन को.र्टाने फेटाळला, आता वांझे ग.जाआड जाणार?