बँकेची कामं आताच आटोपून घ्या! मे महिन्यात बँका तब्बल 13 दिवस बंद राहणार; पाहा तारखा

नवी दिल्ली | एप्रिल महिना संपत असून वर्षाचा पाचवा महिना सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही आतापासून बँकेशी संबंधित कोणतेही काम सोडवण्याचा विचार करत असाल तर, मे महिन्यात बँकेत किती दिवस सुट्ट्या आहेत, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मे महिन्यासाठी बँक हॉलिडे लिस्ट जारी केली आहे. RBI च्या यादीनुसार, पुढील मे महिन्यात एकूण 13 दिवस बँका बंद असणार आहेत.

बँकांच्या सुट्ट्यांची यादी राज्यांच्या आधारावर ठरवली जाते. प्रत्येक राज्यात स्थानिक सणांनुसार सुट्ट्या दिल्या जातात. महिन्याच्या पहिल्या दिवशी बँक बंद असणार आहे.

1 मे रोजी कामगार दिन तसेच महाराष्ट्र दिन आणि रविवार असल्याने बँकेला सुट्टी असणार आहे. भगवान परशुराम जयंती निमित्ताने अनेक राज्यांमध्ये सुट्टी देण्यात येते. त्यामुळे 2 तारखेला देखील बँक बंद असेल.

ईद-उल-फितर निमित्त देशभरात जवळपास सुट्टी असते. येत्या 3 तारखेला ईद-उल-फितर निमित्त सुट्टी असेल. तर याच दिवशी कर्नाटकात बसव जयंती निमित्त बँक बंद असणार आहे.

तर तेलंगानामध्ये 4 तारखेला ईद-उल-फितर निमित्त सुट्टी आहे. त्यानंतर 8 तारखेला रविवारमुऴे बँका बंद असणार आहे. 9 मे रोजी गुरु रवींद्रनाथ जयंती असल्यामुळे पश्मिच बंगाल आणि त्रिपुरामधील बँका बंद असतील.

14 मेला दुसरा शनिवार आणि 15 ला रविवारची सुट्टी असेल. तर 16 मे ला बुद्ध पोर्णिमा असल्याने देशभर बँका बंद असणार आहे. 22 ला पुन्हा रविवारची सुट्टी असेल.

काजी नजरूल इस्लाम जन्मदिना निमित्त सिक्कीमध्ये सुट्टी असणार आहे. त्यानंतर 28 आणि 29 मे रोजी बँका पुन्हा शनिवार आणि रविवारमुळे बंद असतील.

महत्त्वाच्या बातम्या- 

“विराटने चौथ्या आणि पाचव्या नंबरवर खेळावं मग…”, माजी खेळाडूचा किंग कोहलीला सल्ला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांची भाजपवर जोरदार टीका, म्हणाले…

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट गरजेची’, केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य

‘…तर आम्हाला फाशी द्या’, कोर्टाच्या निर्णयानंतर नवनीत राणांचं ट्विट चर्चेत

प्रत्येक कट उधळला जातोय, भाजपला राज्यात…’, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ