“विराटने चौथ्या आणि पाचव्या नंबरवर खेळावं मग…”, माजी खेळाडूचा किंग कोहलीला सल्ला

मुंबई | भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली मागील दोन वर्षापासून त्याच्या फाॅर्ममध्ये नसल्याचं पहायला मिळत आहे. विराट कोहलीसाठी (Virat Kohli) आयपीएल 2022 चा (IPL 2022) हंगाम निराशाजनक राहिला आहे.

आरसीबीच्या माजी कर्णधाराला सध्याच्या चालू हंगामात एक एक रन करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. मागील दोन सामन्यात विराट गोल्डन डकवर आऊट झाला. त्याला खातं देखील उघडता आलं नाही.

अशातच आता विराटवर अनेकांना टीका करण्यास सुरूवात केली आहे. तर काही खेळाडू विराटला धीर देत असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता माजी भारतीय खेळाडूने विराटला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

विराटने त्याची खेळण्याची पोझिशन चेंज करून खालील क्रमांकावर खेळायला पाहिजे, असं भारताचा माजी फलंदाज वसीम जाफर याने म्हटलं आहे. विराटला पुन्हा कमबॅक करायचं असेल तर त्याला चौथ्या किंवा पाचव्या पोझिशनवर काही सामने खेळावे, असं जाफर म्हणाला आहे.

या क्रमांकावर खेळल्यामुळे विराटला स्विंग गोलंदाजांपासून वाचता येऊ शकतं आणि तो चांगल्या धावा करू शकतो. त्यानंतर तो आपल्या तीन नंबरच्या पोझिशनवर येऊन खेळू शकतो, असंही जाफर म्हणाला आहे.

दरम्यान, विराट कोहलीने सुरूवातीला चांगली फलंदाजी केली होती. मात्र, मागील दोन सामन्यात तो शुन्यावर बाद झाला. त्यामुळे आता विराटचे चाहते देखील नाराज झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांची भाजपवर जोरदार टीका, म्हणाले…

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट गरजेची’, केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य

‘…तर आम्हाला फाशी द्या’, कोर्टाच्या निर्णयानंतर नवनीत राणांचं ट्विट चर्चेत

प्रत्येक कट उधळला जातोय, भाजपला राज्यात…’, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

“मैं करू तो साला, कॅरेक्टर ढीला है”, अमृता फडणवीसांचा खोचक टोला