“मला अनेकांच्या गळ्याचा घोट घ्यायचा आहे…”

पुणे | ज्या महापालिकेच्या पायरीवर भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) पडले. त्याच पायरीवर सोमय्या यांचा सत्कार करण्याचा निर्णय भाजप कार्यकर्त्यांनी घेतला. मात्र, पुणे महापालिकेने (Pune Corporation) परवानगी नाकारल्याने भाजप (Bjp) कार्यकर्ते आणि नगरसेवक चांगलेच संतप्त झाले.

भाजप नगरसेवक आणि कार्यकर्ते पालिकेच्या पायरीवर मोठ्या संख्येने जमले. कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली. तेवढ्यात सोमय्या पालिकेच्या आवारात आल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. मात्र सोमय्यांना धक्काबुक्की होऊ नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस त्यांना पालिकेत घेऊन गेले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘ठाकरे सरकार हाय हाय’, ‘जिंदाबाद जिंदाबाद, किरीट सोमय्या जिंदाबाद’, ‘एकच भाई, किरीट भाई’, ‘आता कसं वाटतंय गोड गोड वाटतंय’, अशा घोषणा दिल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी झालेल्या कार्यक्रमादरम्यान भाजपचे जेष्ठ नेते गिरीश बापट यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यांना अनेकांच्या गळ्याचा घोट घ्यायचा आहे, असं बापट म्हणालेत.

काँग्रेसवाले गोमुत्र घेऊन गेलेत. तपासायला पाहिजे. कदाचित वाईन असेल. त्याचा वास इथपर्यंत येतोय. मी फक्त वासावर आहे, पित नाही कधी. त्यामुळे मी किरीट सोमय्या यांचे आभार मानतो, असं ते म्हणाले.

संजय राऊतपासून अनेक जण म्हणत असतील या किरीट बाबाला तुम्ही यूपीत का नाही पाठवलं? पण अनेक अखिलेश इथं देखील आहेत. त्यांची वाट लावण्याचं काम सोमय्या करत आहेत, असंही गिरीश बापट यांनी म्हटलंय.

दरम्यान, यावेळी बोलताना किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. महानगरपालिकेची (Pune Municipal Corporation)परवानगी नसतानाही भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या पायऱ्यांवरच किरीट सोमय्याचा(Kirit Somaiya) सत्कार केला. मी पुणे भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik)याचे आभार मानतो व शाब्बासकी देतो. या उद्धव ठाकरेच्या गुंडांनी या महापालिकेच्या पायऱ्यांवर माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. होता. त्या मुख्यमंत्री ठाकरेंना माझं चॅलेंज आहे. तुम्ही ज्या कोविड कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं त्या कंपनीचा, मालक कोण आहे ? उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यानं नाव सांगावं, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-  

‘या’ शेअर्सने गुंतवणूकदार मालामाल; पैसे झाले दुप्पट 

“राजभवानातील नाचणारे मोर हे डसणाऱ्या सापापेक्षा बरे” 

काळजी घ्या! कोरोनामुक्त झालेल्यांना ‘या’ गंभीर आजाराचा धोका; अत्यंत धक्कादायक माहिती समोर 

दहावी, बारावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; लवकर अर्ज करा 

‘प्रॉमिस डे’ला जयंत पाटलांनी शरद पवारांना दिलं ‘प्रॉमिस’, म्हणाले…