‘वडिलांचा विजय होईपर्यंत लग्न करणार नाही’; ‘या’ बड्या काँग्रेस नेत्याच्या मुलीचं वक्तव्य

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांची मुलगी राबियाही पंजाब विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरली आहे. अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासाठी त्या घरोघरी प्रचारात व्यस्त आहेत. या जागेवर अकाली दलाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बिक्रम सिंह मजिठिया सिद्धू यांना कडवी टक्कर देत आहेत.

निवडणूक प्रचारादरम्यान राबियाने तिच्या लग्नावर भाष्य केलं आहे. पत्रकारांनी राबियाला तिच्या लग्नाबद्दल विचारलं असता तिने सांगितलं की जोपर्यंत तिचे वडील जिंकत नाहीत तोपर्यंत ती लग्न करणार नाही.

अमृतसर पूर्व मतदारसंघात प्रचार करताना राबिया यांनी त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर निशाणा साधला.

राबिया म्हणाल्या की, नवज्योत सिंग सिद्धू आणि चरणजीत सिंग चन्नी यांच्यात तुलना होऊ शकत नाही. राबिया यांनी चरणजीत सिंह चन्नी यांच्या प्रतिमेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

रविवारी चरणजित सिंग चन्नी यांची काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री चेहरा म्हणून ओळख करून दिली. राहुल गांधी म्हणाले होते, पंजाबच्या लोकांनी सांगितलं की आम्हाला गरीब घरातील मुख्यमंत्री हवा आहे जो त्यांना समजेल. तो खूप कठीण निर्णय होता. पण पंजाबच्या जनतेने ते सोपं केलं.

राबिया म्हणाल्या, नवज्योत सिंग सिद्धू एक प्रामाणिक व्यक्ती आहेत, तर चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांच्यात तुलना होऊ शकत नाही.

राबिया म्हणाली, पंजाबमध्ये सर्वात मोठी समस्या रोजगाराची आहे. यामुळे अनेक तरूण रोजगारासाठी बाहेर पडत आहेत. माझ्या वडिलांचे पंजाबवर खूप प्रेम आहे. त्यांनी पंजाबची भरभराट बघायची आहे. पंजाबप्रती त्यांचा विचार खूप प्रामाणिक आहे. पंजाब मॉडेलसाठी त्यांनी बरीच वर्षे घालवली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

‘या’ शेअर्सने गुंतवणूकदार मालामाल; पैसे झाले दुप्पट 

“राजभवानातील नाचणारे मोर हे डसणाऱ्या सापापेक्षा बरे” 

काळजी घ्या! कोरोनामुक्त झालेल्यांना ‘या’ गंभीर आजाराचा धोका; अत्यंत धक्कादायक माहिती समोर 

दहावी, बारावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; लवकर अर्ज करा 

‘प्रॉमिस डे’ला जयंत पाटलांनी शरद पवारांना दिलं ‘प्रॉमिस’, म्हणाले…