शेलारांनी कोपऱ्याने खुणावताच महाजन खडबडून उठले अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल

मुंबई | विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे. त्यावेळी भाजपने महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं.

बीडमध्ये गोळीबाराचा थरार पहायला मिळाला होता. पोलीस प्रशासनाला आव्हान देत जिल्हाधिकारी कार्यालयातमध्ये जमिनीच्या वादातून गोळीबारात करण्यात आला होता.

त्यावरून बीडमध्ये मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

फडणवीस बोलत असताना मागे गिरीश महाजन आणि आशिष शेलार बसले होते. त्यावेळी गिरीश महाजन डुलकी घेत असल्याचं पहायला मिळालं.

फडणवीसांच्या मुद्द्याला शेलारांनी हात वर करत दाद दिली. त्यावेळी महाजनांना शेलारांनी कोपऱ्याने खुणावत जागं केलं. शेलारांच्या सुरात सुर मिसळत महाजनांनी देखील हात वर केले.

महाजनांनी हात वर करत गोळीबार झाल्याच्या मुद्द्याला समर्थन केलं. त्यावेळी मागील नेते देखील हसत होते.

दरम्यान, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया देखील येताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ-


महत्वाच्या बातम्या- 

‘उन्हाळ्यात पुन्हा पसरू शकतो कोरोना’; कोविड टास्क फोर्सचा गंभीर इशारा, म्हणाले…

Russia Ukraine War: स्पेशल विमानाने हरजोत सिंह भारतात परतणार; पाहा व्हिडीओ

ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; वाचा आजचे ताजे दर

नवाब मलिकांना दिलासा नाहीच! कोर्टानं ‘या’ तारखेपर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी

आत्ताची सर्वात मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाचं विधेयक अधिवेशनात मंजूर