नवी दिल्ली | जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणून फुटबाॅलला ओळखलं जातं. अप्रतिम चालाखीच्या जोरावर खेळला जाणारा या खेळाचे चाहते जगभरात आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात सामने होतात.
मेक्सिकोमध्ये फुटबाॅल पाहणाऱ्यांची संख्या ही लक्षणीय आहे. मेक्सिकन नागरिकांना सर्वाधिक आवडणारा खेळ म्हणूनही फुटबाॅलनं आपली ओळख निर्माण केली आहे. अशातच एक वाईट घटना घडली आहे.
मेक्सिकोमधील मैदानात सुरू असलेल्या फुटबाॅल सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये एकदम भांडणाला सुरूवात झाली. अचानकपण सुरू झालेल्या या भांडणानं उग्र रूप धारण केल्यानं सर्वांना धक्का बसला आहे.
सामन्याच्या 62 व्या मिनिटाला अचानकपणे हा सामना थांबवावा लागला आहे. प्रचंड मोठ्या भांडणात मैदानातील सुरक्षा व्यवस्थेचे प्रेक्षकांनी वाभाडे काढले आहेत.
वादामध्ये 26 जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी 10 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मैदानात गोंधळ सुरू होताच सुरक्षा रक्षकांनी खेळाडूंना लगेचच सुरक्षित ठिकाणी हलवलं.
मैदानासोबतच मैदानाबाहेर देखील गोंधळ उडाल्यानं काहीजणांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील मिळाली आहे. आफ्रिका कप नेशन फुटबाॅल स्पर्धेचा सामना सुरू असताना हा प्रकार घडल्यानं विविध संघटनांनी निषेध वर्तवला आहे.
ओलेंबे मैदानाची क्षमता ही 60 हजार प्रेक्षकांची आहे पण कोरोनामुळं केवळ 80 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिल्यानं हा गोंधळ झाल्याचं समोर येत आहे. लहान मुलांचा देखील यामध्ये समावेश आहे.
दरम्यान, या घटनेच्या गोंधळाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. काॅन्फेडरेशन ऑफ आफ्रिका फुटबाॅलनं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
पाहा व्हिडीओ –
Dramatic scenes today in Mexico. Reports of 17 dead at the Atlas vs Querétaro game.
😱😱😱 pic.twitter.com/35GGIiENwT— puritan (@puritan_777) March 6, 2022
महत्त्वाच्या बातम्या –
ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; वाचा आजचे ताजे दर
नवाब मलिकांना दिलासा नाहीच! कोर्टानं ‘या’ तारखेपर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी
आत्ताची सर्वात मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाचं विधेयक अधिवेशनात मंजूर
“…तर अजित दादांना फासावर लटकवाल का?”
‘…तर मी विधानसभेतच फाशी घेईल’; रवी राणा भडकले