काजोलच्या गाण्यावर मुलगी न्यासाचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

मुंबई| अभिनेत्री काजोल आणि अजय देवगणची मुलगी न्यासाची फॅन फॉलोइंग एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. काजोल आणि अजय देवगणची लाडकी लेक न्यासा देवगण भलेही चित्रपटांपासून दूर आहे. पण ती नेहमीच चर्चेत असते. न्यासा सध्या सिंगापूरमध्ये तिचं शालेय शिक्षण पूर्ण करतेय. नुकताच न्यासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

न्यासाची सोशल मीडियावर तिच्या नावाची अनेक फॅनपेज आहेत. जिथे तिचे नव-नवीन फोटो कायम व्हायरल होत असतात. स्वत: काजोलने एका मुलाखतीत सांगितले होते की, न्यासा तिला सोशल मीडियावर फोटो शेअर करण्याचा सल्ला देत असते. काजोलप्रमाणेच तिच्या मुलीलाही नृत्याची आवड आहे. नुकताच न्यासाचा एक डान्स व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूडमध्ये सुपरहिट ठरलेल्या ‘कभी खुशी कभी गम’ या सिनेमातील ‘बोले चुडिया’ या लोकप्रिय गाण्यावर न्यासा आणि तिचे वर्गमित्र डान्स करताना दिसत आहेत. सिनेमातील या गाण्यात बिग बी अमिताभ बच्चन, जया बच्चन त्याचप्रमाणे शाहरुख खान, काजोलची जोडी आणि बऱ्याच कलाकारांनी ठेका धरला होता. काजोलच्या याच हिट गाण्यावर तिच्या लेकीने ठेका धरत धमाल केल्याचं पाहायला मिळतंय.

या व्हिडीओत नास्या जबरदस्त डान्स करताना दिसतेय. पांढऱ्या रंगाचं क्रॉप टॉप आणि भरजरी स्कर्ट घालून ती ठुमके देतेय. फक्त बोले चुडिया’ या गाण्यावर नाही तर पुढे तिने ‘माय नेम इज खान’ सिनेमातील ‘सजदा’ आणि ‘तेरे नैया’ गाण्यावरही  डान्सची मजा लुटली. शेवटी नास्याने ‘नगाडा’ गाण्यावर तिच्या वर्ग मित्रांसोबत धमाल डान्स केला आहे.

न्यासा अजून 19 वर्षांची आहे. येत्या 20 एप्रिलला ती 20 वर्षांची होणार आहे. त्याआधीच ती आपल्या आईवडिलांप्रमाणे प्रसिद्ध झाली आहे.

काजोल व अजयची मुलगी असल्याने न्यासा सतत चर्चेत असते. मध्यंतरी न्यासा बॉलिवूडमध्ये करिअर करणार, अशीही चर्चा होती. पण न्यासाचा तसा काहीही इरादा नाही. न्यासाला चित्रपटात अभिनय करण्याची मुळीच इच्छा नाही, असे खुद्द काजोलने यानंतर स्पष्ट केले होते.

नास्याचं इन्स्टाग्रामवर अकाऊंट असून ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. मात्र तिचं अकाऊंट प्रायव्हेट आहे. असं असलं तरी नास्याचे फॅनग्रुप अनेक असून ते इन्स्टाग्रामवर तिच्या अनेक पोस्ट शेअर करत असतात.

अजय देवगन आणि काजोल यांनी 1999 मध्ये लग्नं केलं होतं. या जोडीने अनेक चित्रपटांत सोबत काम केलं आहे. लग्नावेळी काजोलचं वय फार कमी होतं. त्यामुळे तिचे वडील या लग्नाच्या विरोधात होते. मात्र काजोलची आई ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. काजोल आणि अजयच्या लग्नाला तब्बल 23 वर्षे झाली आहेत. या दोघांना मुलगी न्यासा आणि मुलगा युग अशी दोन मुलं आहेत.

 


महत्वाच्या बातम्या – 

आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘या’ मराठी चित्रपटानं…

ऐन गुढीपाडव्याच्या सणाला सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा…

‘या’ अभिनेत्रीनं मोराच्या जवळ जाण्याचं धाडस केलं पण चांगलंच अंगलट आलं, पाहा व्हिडीओ

पोलीस पतीला हॉटेलच्या खोलीत प्रियकरासोबत आढळली पत्नी, अन् मग…; व्हिडीओ व्हायरल

‘ही’ तरुणी चक्क नग्नावस्थेत डोंगर सर करते! जाणून घ्या काय आहे कारण?