मुंबई | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता देशभर एकच चर्चा होताना दिसत आहे. कोणत्याही कार्यक्रमात मोहन भागवत रोखठोक भूमिका घेताना दिसतात. अशातच हरिद्वारमधील एका कार्यक्रमात त्यांनी मोठं वक्तव्य केलंय.
मोहन भागवत यांनी पुढील 15 वर्षात अखंड भारत होईल आणि आपल्या सर्वांना तो पहायला मिळेल, असं वक्तव्य केलंय. हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे, असंही मोहन भागवत यावेळी म्हणाले आहेत.
अहिंसेचा पुरस्कार करतो, मात्र पुरस्कार हातात दंडुके घेऊनच होईल, असं वक्तव्य केल्याने आता मोहन भागवत यांच्यावर टीका होऊ लागली आहे.
मोहन भागवत यांच्या या वक्तव्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. आधी पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घ्या, मग पाकिस्तान ताब्यात घ्या, अफगाणीस्तान घ्या, मग एक अखंड भारत निर्माण करा, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
त्याआधी स्वांतत्रवीर सावरकरांना भारतरत्न द्या. त्याचबरोबर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांनी अंखड हिंदुस्थान ही संकल्पना राबवली त्यांचे आभार माना, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, जो हिंदूस्तानचा भाग होता त्याला आधी ताब्यात घ्या. कश्मिरी पंडिताला पुन्हा परत आणा, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भाजप-मनसे युती होणार?; चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं…
“जसा उंच असतो ढोंगा, बरा नाही तो भोंगा”
“स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात”
Jayashree Patil | गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील फरार
अत्यंत धक्कादायक प्रकार समोर; घोरपडीवर सामूहिक बलात्कार