भाजप-मनसे युती होणार?; चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं…

मुंबई |  राज्यात 2019 विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपची फारकत झाली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास सरकार स्थापन झाले. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदूत्वाच्या मुद्याकडे वाटचाल केली आहे. मनसेने हिंदूत्वाचा मुद्दा उचलल्याने भाजप-मनसे युती होणार का?, अशा चर्चांणा उधाण आलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. अशा प्रकारच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी आमची राज्याची 13 जणांची कोअर कमिटी आहे.

आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. फक्त केंद्राकडे प्रस्ताव पाठवू शकतो, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. त्यामुळे तसा कोणताही निर्णय आता नाही, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे हे एक स्वतंत्र्य व्यक्तीमत्व आहेत. ते कोणाचीही बी टीम म्हणून काम करत नाहीत. कोणाच्याही सांगण्यावरून ते बोलत नाहीत.

राज ठाकरे यांना जी मत मांडायची आहेत ती ते परखडपणे मांडतात. यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप विरोधात मते मांडली होती, असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

महाविकास आघाडी आणि पवारांचं असं आहे की, त्यांना बरं म्हटलं की, सगळं बरं. नाहीतर काहीतरी गडबड असते. किरीट सोमय्यांना न्याय दिला की, काहीतरी गडबड असल्याचं म्हणण योग्य नाही, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि मनसे युती होणार, अशा चर्चा राज्यभरात सुरू होत्या. मात्र, युतीसंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, असं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“जसा उंच असतो ढोंगा, बरा नाही तो भोंगा”

“स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात”

Jayashree Patil | गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील फरार 

अत्यंत धक्कादायक प्रकार समोर; घोरपडीवर सामूहिक बलात्कार 

रणबीर कपूरच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; रणबीरने घेतला मोठा नि