Gold Rate: सोन्याच्या दरात मोठी वाढ, वाचा ताजे दर

मुंबई | आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Rate) चढउतार होताना दिसत होतं. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम सोनं चांदीच्या किंमतीवर होतोय.

रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम थेट सोनं चांदीच्या किंमतीवर होताना दिसत आहे. तर आंतराष्ट्रीय बाजारात देखील चढ उतार होताना दिसतोय.

आज सोन्याचा भाव 51 हजारांच्या वर तर चांदीचा भाव 62 हजारांच्या वर गेला आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज वर, सोमवारी सकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची फ्युचर्स किंमत 7 रुपयांनी किरकोळ वाढून 51,350 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली.

तसेच चांदीचा भाव 52 रुपयांनी वाढून 62,600 रुपये प्रति किलो झाला. लग्नसराईच्या मुहुर्तावर आता सोन्याच्या किंमती वाढलेल्या पहायला मिळत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालंय.

सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतंय.

दरम्यान, सोन्याच्या दरात स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “माझी 99 टक्के संपत्ती वडिलोपार्जित, ती राज्य सरकारकडे जाहीरही केलीये”

कृष्णप्रकाश यांची संपत्ती किती?, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर  

 ‘त्या’ लेटरबॉम्बवर कृष्णप्रकाश यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘धनंजय मुंडेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं’; दिग्गज नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण 

 ‘सहकाऱ्यांना सोडून पळणारा मुख्यमंत्री नसावा’; भुजबळांचा टोला नेमका कुणाला?