पुणे महाराष्ट्र

पुण्याचे गोल्डमॅन सम्राट मोझे यांचं निधन

पुणे |  पुण्याचे गोल्डमॅन अशी ख्याती असलेल्या सम्राट मोझे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. पुण्यातल्या सह्याद्री रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

काल रात्री अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल केलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी तसंच त्यांची दोन लहान मुलं आहे.

सम्राट मोझे हे माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे पुतणे होते. सम्राट यांची दागिने घालण्याची पद्धत वेगळी होती. ते एकाचवेळी 8 ते 10 किलो सोने आपल्या अंगावर घालत असत. म्हणून त्यांची ओळख पुण्याचे गोल्डमॅन अशी झाली होती.

काही दिवसांपूर्वी त्यांनी आपली सोशल मीडियावर बदनामी होतीये, अशी तक्राक सायबर सेलकडे केली होती. आता त्यांच्या निधनाने संगमवाडीवर शोककळा पसरली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-योगी सरकारने स्थलांतरित मजुरांबाबत घेतलेला निर्णय माणुसकीला धरून नाही- संजय राऊत

-मोदी सरकारनं लॉकडाऊन केला… उद्धव ठाकरेंनी आधार दिला…; ऐका थेट उसाच्या शेतातून कोरोनावरचं गीत

-कोरोनाला हरवायचंय, पाहा WHO ने काय सांगितलाय जालीम उपाय

-लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

-“आघाडीचं सरकार चालवणं ही तारेवरची कसरत आहे”