सर्वसामान्यांसाठी खुशखबर! आता पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त होणार?

नवी दिल्ली | अलिकडे काही वर्षांमध्ये इंधनांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. इंधनांच्या वाढत्या भावांमुळे वाहन चालवणे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे.

इंधनांचे दर जीएसटीच्या कक्षेत आणावेत, अशी मागणी देशभरातून केली जात आहे. याबाबत देशभरातील लोक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. अशातच आता सर्वसामान्यांना थोडा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

गेल्या दोन आठवड्यांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत 7 टक्क्यांची कपात झाली आहे. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात देखील कपात झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे दर आणखी उतरण्याची शक्यचा वर्तवली जात आहे.

आयआयएफएल सिक्युरिटीजचे अध्यक्ष अनुज गुप्ता इंधनांच्या दराबाबत बोलताना म्हणाले की, कोरोनामुळे इंधनांची मागणी कमी झाली आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. मागणी कमकुवत झाल्यास किंमती आणखी खाली येऊ शकतात.

कच्च्या तेलाच्या किंमतीत अशीच घसरण होत राहीली तर याचा फायदा सर्वसामान्यांना मिळू शकेल. यामुळे तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आणखी कपात करु शकतात, असंही अनुज गुप्ता यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पेट्रोलवर राज्य आणि केंद्राचा मिळून तब्बल 60 टक्के कर आकारला जातो. तसेच डिझेलवर राज्य आणि केंद्राचा मिळून तब्बल 54 टक्के कर आकारला जातो. हे कर सरकारने कमी केल्यास पेट्रोल, डिझेलचे दर खाली येऊ शकतात.

पेट्रोल डिझेलचे वाढते दर नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. सध्याचे केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दराचे खापर पूर्वीच्या सरकारवर फोडत आहे. इंधनाच्या वाढत्या भावावरुन सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपाची खेळी चालू आहे. मात्र, सामान्य नागरीकच यामध्ये चेपला जात आहे.

इंधन दरवाढ हा एक राष्ट्रीय प्रश्नच बनला आहे. इंधन दरवाढीवरुन नेटकरी नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. तसेच आंतराष्ट्रीय स्तरावर इंधनांचे दर कमी झाले आहेत त्याचप्रमाणे आता देशांतर्गत देखील कमी करावेत, अशी मागणी देशभरातून केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

बॉबी देओलने 24 वर्षांपूर्वीच केली होती कोरोनाची भविष्यवाणी; व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

‘माझे आजोबाच माझं लैं.गिक शो.षण करायचे’; ‘या’ बड्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा!

अचानक या सिंहाला काळ समोर दिसला अन् तो जागीच तडफ.डून म.रण पावला; पाहा व्हिडीओ

पार्किंगच्या वादातून अभिनेता अजय देवगनला मारहाण? व्हिडीओ व्हायरल

“वाझेंनी असा कोणता खुलासा केला की, शरद पवारांच्या अचानक पोटात दुखायला लागलं”