मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadanvis) यांनी जागतिक कर्करोग दिनानिमित्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या नव्या गाण्याची घोषणा केली आहे.
महाशिवरात्रीच्या आधी एक नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मात्र त्यांनी अजून या गाण्याचं नाव जाहीर केलं. काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांचे ‘गणेश वंदना’ हे गीत प्रेक्षकांच्या भेटीस आलं होतं.
गायिका योहानीचे Manike Mage Hithe हे गाणं देखील अमृता फडणवीस यांनी गायले होते. त्यावेळी याला प्रचंड पसंती मिळाली होती. तर दिवाळीला त्यांनी ‘ओम जय लक्ष्मी माता’ हे गीत प्रदर्शित केलं होतं.
अमृता फडणवीस स्वत: बँकर आहेत. त्या पार्श्वगायनही करतात. फडणवीस यांचे अनेक अल्बम याआधी प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे चाहते कायम गाण्याची वाट पाहात असतात. या चाहत्यांना आता आणखी एक पर्वणी मिळणार आहे.
अमृता फडणवीस यांचं गणपतीवर गाणं आलं होतं. यानंतर ‘तीला जगू द्या’, हे तरुणींवरील अत्याचाराला वाचा फोडणारं गाणंही हीट झालं. तर, देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांनी राज्यातील नद्यांवरही गाणं गायलं होतं.
दरम्यान, गणेशोत्सव काळातही अमृता यांनी एक गाणं चाहत्याच्या भेटीसाठी आणलं होतं. गणेश वंदना असं या गाण्याचं नाव होतं. तर, या गाण्यातून एक सामाजिक संदेशही देण्यात आला होता.
भक्तीचे दुसरे नाव सेवा, असा सकारात्मक संदेश गाण्यातून देण्यात आला आहे. अमृता फडणवीस यांनी कुटुंबातील प्रमुख स्त्रीची भूमिका साकारली होती. त्यामुळं आता या नवीन गाण्यातून अमृता फडणवीस कोणता सामाजिक संदेश देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; मराठी चित्रपटासाठी गायलेलं गाणं लवकरच येणार
देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार?; केंद्र सरकारचं मोठं वक्तव्य
9 रुपयांचा शेअर 8 महिन्यात 650 रुपयांना, लाखाचे झाले असते 72 लाख
मोदींची स्तुती करणं विद्यार्थ्यांला पडलं महागात; विद्यापीठाने केलं असं काही की…
पोस्टाची बंपर योजना; लेकीच्या 18 व्या वर्षी मिळतील ‘इतके’ लाख