ग्राहकांसाठी खुशखबर! सोने चांदीचे भाव पुन्हा गडाडले

नवी दिल्ली | अनेकांना सोन्याचे दागिने घालण्याची हौस असते. दिवाळी दसरा म्हटलं की भारतीय स्त्रियांची दागिने खरेदी करण्याची घाई असते. सोन्याची वाढत जाणारी मागणी पाहता अलिकडच्या काळात सोन्याचे भाव देखील गगनाला भिडले आहेत.

मात्र, सोनं चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आता एक खुशखबर आहे. देशांतर्गत बाजारात बुधवारी सोन्याचे भाव घसरले आहेत. बुधवारी दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याचे दर 118 रुपयांनी घसरले आहेत. आधीच्या सत्रात सोन्याचे दर 49,339 रुपये प्रती तोळा होते. मात्र, हेच दर आता 49,221 रुपये प्रती तोळावर आले आहेत.

तसेच चांदीचे भाव देखील घसरले आहेत. एक किलो चांदीच्या दरात 875 रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचे दर 64,285 रुपये प्रती किलो होते. मात्र, हेच दर आता उतरून 63,410 रुपये प्रती किलोवर आले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचे दर 24.22 डॉलर प्रति औंस आहेत.

दरम्यान, मोदी सरकार सोन्याची बाबतीत लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.

संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जावू तशा सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन वसूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.

देशातील अनेक ज्वेलर्स असोसिएशन सध्या मोदी सरकारकडे ‘वन नेशन वन गोल्ड’ ही योजना संपूर्ण देशभरात लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करत आहेत. मोदी सरकार ज्वेलर्स असोसिएशनच्या या मागणीवर विचार करत असले तरी अद्याप सरकारने याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! फडणवीस सरकार मधील ‘या’ माजी मंत्र्याचं नि.धन

भारतीय बाजारात ‘या’ नव्या SUVची जोरदार क्रेझ; अवघ्या 5 दिवसात 5 हजार बुकिंग!

ॲानस्क्रीन ‘हर्षद मेहता’ची करामत!; 58 दिवसांत कमी केलं 10KG वजन; पाहा व्हिडीओ

विंचवाचं विष विकून झाला करोडपती; एका ग्रॅमसाठी मिळतात तब्बल ७ लाख रुपये!

सोनिया गांधी जेव्हा पहिल्यांदा इंदिराजींना भेटल्या तेव्हा घडला होता ‘हा’ धक्कादायक प्रकार!