धक्कादायक! फडणवीस सरकार मधील ‘या’ माजी मंत्र्याचं नि.धन

पालघर | राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा शोककळा पसरला आहे. फडणवीस सरकारमधील आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री विष्णू सावरा यांचे बुधवारी संध्याकाळी नि.धन झाले आहे. विष्णू सावरा हे 72 वर्षांचे होते. संवेदनशील, जागृत आणि कर्तव्यदक्ष नेता म्हणून सावरा यांची ओळख होती.

गेल्या दोन वर्षांपासून विष्णू सावरा हे यकृताच्या आजाराने त्रस्त होते. दोन वर्षांपासून त्यांच्यावर उपचार देखील चालू होते. अलीकडे अचानक विष्णू सावरा यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, बुधवारी अखेर त्यांची मृ.त्यूशी झुंज थांबली आणि त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

विष्णू सावरा हे राजकारणात येण्याअगोदर बँकेत नोकरी करत होते. मात्र, त्यांनी 1980 मध्ये बँकेची नोकरी सोडली आणि ते भारतीय जनता पार्टीचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करू लागले. 1980 आणि 1985 अशा दोन्ही वेळेस भाजपने वाडा मतदार संघातून विधानसभा निवडणुकीसाठी सावरा यांना उमेद्वारी दिली होती. मात्र, दोन्हीही वेळेस सावरा यांचा पराभव झाला होता.

सलग दोनवेळा पराभव पत्कारून देखील सावरा यांनी आपले कार्य चालूच ठेवले. 1990च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सावरा यांना तिसऱ्या वेळी विधानसभा निवडणुकीसाठी वाडा मतदार संघातूनच उमेद्वारी दिली. यावेळी मात्र सावरा यांनी विजय खेचून आणला.

1990ला सावरा पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले. यानंतर सावरा 2014च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत सातत्याने निवडून आले. सावरा तब्बल 6वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

1995 मध्ये महाराष्ट्रात युती सरकार कार्यरत होतं. युती सरकारच्या शेवटच्या टप्प्यात 1 फेब्रुवारी 1995 रोजी सावरा यांना अवघ्या 6 महिन्यांसाठी आदिवासी विकास मंत्री होण्याचा मान मिळाला होता. मात्र, या सहा महिन्याच्या काळातच त्यांनी आदिवासी लोकांसाठी अनेक विकास कामे पार पाडली.

2014 मध्ये राज्यात शिवसेना आणि भाजपचे सरकार आल्यानंतर सावरा यांच्यावर पुन्हा आदिवासी विकास खात्याचीच जबाबदारी सोपविण्यात आली होती. तसेच नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री म्हणून देखील सावरा यांचीच निवड करण्यात आली होती.

दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनी सावरा यांच्या मृ.त्युचे दुःख व्यक्त केलं आहे. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील विष्णू सावरा यांना श्र.द्धांजली वाहिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय बाजारात ‘या’ नव्या SUVची जोरदार क्रेझ; अवघ्या 5 दिवसात 5 हजार बुकिंग!

ॲानस्क्रीन ‘हर्षद मेहता’ची करामत!; 58 दिवसांत कमी केलं 10KG वजन; पाहा व्हिडीओ

विंचवाचं विष विकून झाला करोडपती; एका ग्रॅमसाठी मिळतात तब्बल ७ लाख रुपये!

सोनिया गांधी जेव्हा पहिल्यांदा इंदिराजींना भेटल्या तेव्हा घडला होता ‘हा’ धक्कादायक प्रकार!

सुशांतच्या बहिणीनं शेअर केलं केदारनाथच्या दिग्दर्शकाचं ट्विट; सुशांतबद्दल लिहिलंय…