महागाईने त्रस्त नागरिकांसाठी आनंदाची बातमी!

नवी दिल्ली | खाद्यतेलाच्या दरात कपात करण्यात आली आहे. वाढत्या महागाईच्या दरात सर्वसामान्यांसाठी ही मोठी बातमी आहे. खाद्यतेलाच्या किमतीत कपात करण्यात आली आहे.

सर्वसामान्यांचा स्वयंपाकघरातील खर्च काहीसा कमी होणार आहे. खाद्यतेल उत्पादकांनी पामतेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमतीत प्रति लिटर 15 रुपयांपर्यंत कपात केली आहे.

ब्रँडेड खाद्यतेलाच्या किमती कमी होतील. मात्र, प्रिमियम खाद्यतेल ब्रँडच्या किमती कमी व्हायला काहीसा वेळ लागेल.

खाद्यतेलाचे भाव कमी झाल्यामुळे परिणामी खाद्यपदार्थांच्या महागाईचा दरही कमी होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम किरकोळ आणि घाऊक बाजारात होऊन महागाईत घट होण्याची अपेक्षा आहे.

धारा रिफाइंड सनफ्लॉवर ऑईल (एक लिटर) पूर्वीच्या 235 रुपयांऐवजी आता 220 रुपये प्रति लिटर असणार आहे. धारा रिफाइंड सोयाबीन तेलाची (1 लिटर) किंमत 209 रुपयांवरून 194 रुपयांपर्यंत कमी झाली आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. आता सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वात मोठी बातमी; वाढत्या विरोधानंतर अग्निपथ योजनेत सरकारने केला मोठा बदल 

मनसे नेते वसंत मोरेंच्या मुलाला धमकी; ‘त्या’ चिठ्ठीने पुण्यात खळबळ 

“राष्ट्रपती पदासाठी उंची लागते, शरद पवार तर…”

देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठी रणनीती, म्हणाले… 

राज्यात मान्सून बरसणार, ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा जारी