पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; महानगरपालिकेने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

पुणे | पुण्यातील मॉल, दुकाने आणि हॉटेल्स सुरु ठेवण्याची वेळ वाढवण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना दिवाळीची खरेदी रात्री 11 पर्यंत करता येईल. रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय, 22 ऑक्टोबर पासून अँम्युझमेंट पार्क आणि संग्रहालय सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा फटका पुण्याला देखील बसला होता. पुण्यामध्ये कोरोना आणि म्युकर मायकोसिसच्या रुग्णांच्या मृत्यूंची संख्या वाढली होती.

पुण्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे तब्बल आठ महिन्यानंतर रुग्णांच्या मृत्यूची संख्या शुन्यावर आली आहे. पुण्याला 6 फेब्रुवारी 2021 नंतर दिलासा मिळाला आहे.

पुण्यात काल दिवसभरात 112 पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर, काल दिवसभरात 118 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरासह पुणे जिल्ह्यातही कोरोनाच्या मृत्यूची संख्या शुन्यावर आली आहे. पुण्यात सध्या 151 गंभीर कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

पुण्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 5 लाख 3 हजार 469 पर्यंत पोहोचली आहे. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 988 वर पोहोचली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“माजी पोलीस आयुक्त आणि माजी गृहमंत्री यांना मस्ती आली आहे, त्यांचे कुठं हनिमून सुरू आहे?”

“मुख्यमंत्रिपद हडपण्यासाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली”

“गाव जेवण एक दिवस देणार की पुढची तीन वर्ष देणार”

“…तर नारायण राणेंची कुंडलीच बाहेर काढू”

“राज्याच्या मुख्यमंत्र्याचं काम शरद पवार करतात”