मुंबई | राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये काहीना काही सुरूच असते. अशातच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृती फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
एकीकडे माजी पोलीस आयुक्त तर दुसरीकडे माजी गृहमंत्री त्यांचे कुठं हनिमून सुरू आहे ?,कुठे लपले आहेत? असे खोचक सवाल करत अमृता फडणीवसांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर चांगलंच टिकास्त्र सोडलं आहे.
माधवबाग व्हॅक्सिन सेंटर सी पी टँक येथे माधवबाग मंदिर प्रांगणात 100 कोटी जनतेला लस देण्यात आल्याबद्दल पंतप्रधान मोदींचं अभिनंदन आणि आभार प्रकट करण्यात आले. त्याठिकाणी 100 दीप प्रज्वलित करण्यात आले. त्यावेळी अमृता फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. तेव्हा त्या बोलत होत्या.
दरम्यान, सरकार लसीकरणाबाबत कायम राजकारण करत आहे. हे त्यांचे नेहमीच सुरू राहणार आहे. सामनातून भाजपवर टीका होणार नाही, तर शिवसेनेचे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतच वसुली सरकार चालणार कसं, असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“मुख्यमंत्रिपद हडपण्यासाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली”
“गाव जेवण एक दिवस देणार की पुढची तीन वर्ष देणार”
“…तर नारायण राणेंची कुंडलीच बाहेर काढू”
“राज्याच्या मुख्यमंत्र्याचं काम शरद पवार करतात”
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ सर्वांना बोनस मिळणार