नवी दिल्ली | कोरोना महामारी सध्या जगभरात थैमान घालत आहे. कोरोनाच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. अशात सर्वत्र चिंतेचं वातावरण असताना जागतिक आरोग्य संघटनेनं एक चांगली माहिती सांगितली आहे.
गत दीड वर्षापासून सर्वत्र फक्त कोरोना या एकाच नावाचा बोलबाला आहे. अनेक व्यवस्था आणि सरकार या कोरोनासमोर कोलमडून पडत आहेत. परिणामी कोरोनावर निश्चित असा मार्ग निघणं गरजेचं बनलं आहे.
कोरोना रूग्णांचा आकडा काही महिन्यांपूर्वी कमी झाला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्राॅन सापडल्यानं सर्वत्र हाहाकार माजला होता.
ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येत इतक्या झपाट्यानं वाढ झाली की, अनेक देशांना आपल्या देशात निर्बंध लावावे लागले होते. दक्षिण आफ्रिका, युरोपियन देशांमध्ये तर कोरोनानं धुमाकुळ घातला होता.
दक्षिण आफ्रिकेमध्ये आता कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट व्हायला सुरूवात झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रूग्णांमध्ये तब्बल 14 टक्के घट झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
जगभर मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार झाला असताना आता आफ्रिकेतील चौथी लाट आटोक्यात येत असल्याचं आरोग्य संघटनेच्या अभ्यासात समोर आलं आहे. परिणामी चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.
सगल 6 आठवडे आफ्रिकेमध्ये कोरोना रूग्णांचा आकडा हा विक्रम करत होता. पण सध्या ही आकडेवारी कमी झाली आहे. सध्या 14 टक्के घसरण नोंदवली गेली आहे.
सध्या कोरोनापासून वाचण्याचं आणि त्याच्यावर मात करण्याचं एकमेव माध्यम हे लसीकरण आहे. परिणामी सर्व देशांना आरोग्य संघटनेनं लसीकरणाचा वेग वाढवण्यास सांगितलं आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोना आकडेवारीत घसरण होत असली तरी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचं आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटनंतर कॅप्टन कोण???, लिटल मास्टरने घेतलं ‘या’ खेळाडूचं नाव
अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद
शाळा सुरू करण्यासंदर्भात राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“दुधातील माशी प्रमाणे मित्रपक्षांनी बाजूला फेकलं”
शॅाकिंग… राजीनामा विराट कोहलीचा; हादरा बसला रोहित शर्माला!