“हिंमत असेल तर संजय राऊतांनी सुरक्षेविना महाराष्ट्रात फिरून दाखवावं”

मुंबई |  देशात पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीवरून पेटलेलं राजकारण आणखीन शांत झालं नसल्याचं सध्यातरी दिसत आहे.

पाच राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या पण गोंधळ तर महाराष्ट्रात होत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार वाद रंगला आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं देखील आपले उमेदवार उभे केले होते. त्यावरूनच पडळकरांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

संजय राऊतांनी विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंना लाॅंन्च केलं आणि त्यांच्या फज्जा उडवला आहे, असं पडळकर म्हणाले आहेत.

याअगोदर काकांनी राहुल गांधींना जशी टोपणनावं मिळवून दिली तशीच आदित्य ठाकरेंना मिळावीत ही संजय राऊतांची सुप्त ईच्छा आहे, असा टोलाही पडळकरांनी राऊतांना लगावला आहे.

राऊत हे वाय दर्जाच्या सुरक्षेवर अग्रलेख लिहितात. राऊत यांच्यात हिंमत असेल तर माझ्याप्रमाणं सुरक्षेविना महाराष्ट्रात फिरून दाखवावं, असं आव्हान देखील पडळकरांनी राऊतांना दिलं आहे. मग आम्हाला देखील कळेल की शेतकऱ्यांचं तुमच्यावर किती प्रेम आहे, असंही पडळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, संजय राऊत यांनी पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विजयाची अपेक्षा केली होती. परिणामी त्यांच्यावर विरोधक टीका करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

सलमान खानला होता ‘हा’ गंभीर आजार; स्वत: भाईजानने केला धक्कादायक खुलासा

 The Kashmir Files: “मी जबाबदार असल्याचं आढळल्यास मला फाशी द्या”

अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“वाकणार नाही, मोडणारही नाही, आमचा बाल कोणी बाका करू शकत नाही”

“जनाब संजय राऊत…तुम्ही सुरक्षेशिवाय राज्यात फिरून दाखवाच”