“पार्थ पवार म्हणजे पुण्याचे पेंग्विन, असं असलं तरी…”

पुणे |  राज्यात दिवसेंदिवस महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये तणाव वाढत चालला आहे. भाजपकडून सातत्यानं महाविकास आघाडीवर जहरी टीका करण्यात येत आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी सातत्यानं राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर पेंग्विनचा उल्लेख करत टीका केली होती. परिणामी राज्यात वाद वाढला होता.

निलेश राणेंनी आता आपला मोर्चा राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांच्याकडं वळवला आहे. पार्थ यांच्यावर लोकसभा निवडणुकीवरून राणेंनी टीका केली आहे.

पार्थ पवार हेलिकॉप्टरने फिरण्या पलीकडे काही करत नाही, हा पुण्याचा पेंग्विन आहे, अशी जहरी टीका राणेंनी केली आहे.

पार्थ पवारांचं असं असलं तरी पिंपरी चिंचवड लोकसभा सीट राष्ट्रवादी ढापणार आणि शिवसेनेच्या बारणेंना घरी पाठवणार, असं म्हणत राणेंनी शिवसेनेला डिवचलं आहे.

मुंबईत राणीच्या बागेत पेंग्विन आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आदित्य ठाकरेंनी राबवला होता. तेव्हापासून राणे कुटुंबीयांकडून आदित्य ठाकरेंना डिवचलं जातं.

राज्यात सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून राजकारण तापलेलं असताना राणेंच्या टीकेनं राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे.

दरम्यान, पार्थ पवार यांना लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून पराभव स्विकारावा लागला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

सलमान खानला होता ‘हा’ गंभीर आजार; स्वत: भाईजानने केला धक्कादायक खुलासा

 The Kashmir Files: “मी जबाबदार असल्याचं आढळल्यास मला फाशी द्या”

अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“वाकणार नाही, मोडणारही नाही, आमचा बाल कोणी बाका करू शकत नाही”

“जनाब संजय राऊत…तुम्ही सुरक्षेशिवाय राज्यात फिरून दाखवाच”