“फडणवीस असे 10-20 शरद पवार खिशात घालून फिरतात”

मुंबई | देशात विधानसभा निवडणूक 2022 चा चांगलाच बोलबाला पहायला मिळत आहे. पाच राज्यांपैकी चार राज्यांत भाजपचीच मुसंडी पहायला मिळाली.

सर्वत्र भाजपमय वातावरण झालेलं असातना मुंबईतही भाजपची सत्ता आणणार, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

अद्याप लढाई संपलेली नाही, मुंबई अजून बाकी आहे, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगितुरा रंगल्याचं दिसत आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचे शिल्पकार फडणवीस ठरले आहे. त्यामुळे आता मुंबईकडे वाटचाल करणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा विस्तार करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला असून महाराष्ट्राबाहेर त्यांचं पारडं हलकं पडत असल्याचं दिसत आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या विजयावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर ताशेर ओढल्याचं पहायला मिळाले.

फडणवीस असे 10-20 पवार खिशात घालून फिरतात. पवारांपेक्षा देवेंद्र फडणीस प्रगल्भ नेेते आहेत, असं पडळकरांनी म्हटलं आहे.

फक्त विश्वासघातकीपणा, गद्दारीपणा, लबाडीपणा, राष्ट्राच्या विरोधातली भूमिका ही शरदचंद्र पवारांची आहे. तसले विषय सोडून त्यांच्या पुढचे नेतृत्व करण्याची ताकद देवेंद्रजींच्या नेतृत्वात आहे, असा दावाही पडळकरांनी केला आहे.

दरम्यान, आज विजय साजरा करा, उद्यापासून कामाला लागा. मुंबईत भाजपचा पूर्ण विजय आणि महाराष्ट्रात भाजपचं बहुमताचं सरकार येण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज राहायला हवं, असं फडणवीस म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “मुंबई पालिकेवर शिवसेनेचाच झेंडा कायम राहणार”

  गोव्यातील विजयामुळे देवेंद्र फडणवीसांचं मुंबईत जंगी स्वागत

  निवडणुकांनंतर Petrol-Diesel दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर

  मोठी बातमी! ….म्हणून मुंबईत ‘इतक्या’ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

  ‘महाविकास आघाडी सरकार केव्हाही पडू शकतं’; काॅंग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ