“महाविकास आघाडीमुळं राज्यातील 12 कोटी जनता असुरक्षित”

मुंबई | देशातील पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. पाचही राज्यातील निकाल आता घोषीत झाले आहेत. भाजपनं परत एकदा आपला दबदबा कायम राखला आहे.

गोवा, मणीपूर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या चार राज्यात आपली सत्ता राखण्यात भाजपला यश आलं आहे. परिणामी सर्वत्र सध्या जल्लोषाचं वातावरण आहे.

गोवा राज्यात भाजपनं मोठी खेळी केली होती. कुटनितीसाठी प्रसिद्ध असणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाजपनं गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी दिली होती.

भाजपला चार राज्यात मोठं यश मिळाल्यानं महाराष्ट्रात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. भाजपकडून महाविकास आघाडीवर जोरदार टीका करण्यात येत आहे.

फडणवीसांच्या स्वागतानंतर भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास घेरण्याचं काम आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेची वाट लागली आहे, असं बावनकुळे म्हणाले आहेत.

राज्यात 12 कोटी जनता ही महाविकास आघाडीमुंळ असुरक्षित आहे, असा आरोप बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

चार राज्यात मिळालेल्या यशानं भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईत मोठा जल्लोष केला आहे. त्यानंतर भाजपकडून मुंबई महापालिकेत शिवसेनला लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात पोलीस दलावर अनेक प्रकारचे आरोप होत असताना आता बावनकुळे यांनी असुरक्षिततेचा मुद्दा उचलल्यानं वातावरण पेटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “सामान्य माणसांच्या मनात मोदी हे एकमेव नेते आहेत”

  निवडणुकांनंतर Petrol-Diesel दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर

  मोठी बातमी! ….म्हणून मुंबईत ‘इतक्या’ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

  ‘महाविकास आघाडी सरकार केव्हाही पडू शकतं’; काॅंग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ

  Health | उन्हाळात अशी घ्या स्वतःची काळजी, नाहीतर होतील ‘हे’ गंभीर परिणाम