मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेत ईडीचं संकट परतावून लावल्याने राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह संचारला. पण त्यानंतर बारामतीत अजित पवार यांची कोंडी करण्यासाठी भाजपने आता नवा डाव टाकल्याचं दिसतय.
वंचित बहुजन आघाडीतून राजीनामा दिलेले धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर भाजपकडून अजित पवार यांच्याविरोधात बारामतीतून लढण्याची शक्यता आहे.
गोपीचंद पडळकर आज दुपारी 12 वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याचं निश्चित झालं आहे.
भाजपकडून थेट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघात रासपचे नेते महादेव जानकर यांना मैदानात उतरवून राज्यभर वातावरण निर्मिती केली होती.
यंदाच्या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकर यांची निवड केली आहे. गोपीचंद पडळकर हेदेखील धनगर समाजाचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात.
महत्वाच्या बातम्या-
“पडळकरांना जोडे मारणाऱ्यांना 50 हजार रुपयांचं बक्षिस” – https://t.co/matHRKSMvR @GopichandP007 @BJP4Maharashtra @INCMaharashtra @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 30, 2019
काँग्रेस सोडणार नाही, भाजप प्रवेशाला विनम्र नकार; ‘या’ आमदाराचा निश्चय – https://t.co/w2oAPyXjwE @INCMaharashtra @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 30, 2019
‘‘दादा, कुछ तो गडबड है!; पवारांच्या राजीनाम्यावर सामनातून बोचरी टीका – https://t.co/ebxL9i0ffs @AjitPawarSpeaks @NCPspeaks @BJP4Maharashtra @INCMaharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 30, 2019