“राज्यातील ठाकरे सरकार हे राक्षसी वृत्तीचं सरकार आहे”

मुंबई | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार आणि मुंबई महापालिका भिकारी आहेत, आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातून आलेल्या कर्मचाऱ्यांचे मुंबईत आंदोलन सुरू आहे. मात्र महापालिका आणि सरकारकडून त्यांना साधं पिण्यासाठी पाणी देखील देण्यात आलं नाही, अशी टीका पडळकरांनी केली आहे.

महापालिकेच्या 79 हजार कोटींच्या ठेवी आहेत, मग त्याचा उपयोग काय?. तसेच सरकारची ही राक्षसी वृत्ती आहे, मात्र त्यांनी लक्षात ठेवावं कितीही गौरसोय झाली तरी आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा देखील यावेळी पडळकर यांनी दिला सरकारला आहे.

सरकारने आता लवकरात लवकर आंदोलनावर तोडगा काढावा. परब हे निर्णयाची कॉपी घेऊन आंदोलनस्थळी आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू, आम्ही विरोधी पक्षात आहोत त्यामुळे आमचे अन्यायाला वाचा फोडण्याचं कामच आहे, असंही ते म्हणाले.

जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशा इशाराही गोपीचंद पडळकर यांनी सरकारला दिला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

ठाकरे सरकार हे दूतोंडी असून, ते कधीही एका भूमिकेवर ठाम राहात नाही. हा संप चिरडवून टाकण्याचा सरकारचा डाव असल्याचंही गोपीचंद पडळकर म्हणालेत.

परिवहन मंत्री माध्यमांसमोर छान बोलतात, मात्र जेव्हा कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ अनिल परब यांच्याकडे चर्चा करण्यासाठी जाते तेव्हा ते त्यांना बोलत देखील नाहीत, असं त्यांनी सांगितलं.

आता परब पुन्हा माध्यमांसमोर येऊन सांगतात की, मी कर्मचाऱ्यांसाठी 24 तास उपलब्द्ध असतो म्हणून, असा आरोप देखील गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

या सरकारच्या काळात राज्यावर अनेक संकटे आली . मात्र या संकटकाळात सरकारने जनसामान्यांना काहीच मदत केली नाही. दोनदा चक्रिवादळ आले, अतिवृष्टी झाली अशा नैसर्गीक अपत्तीमध्ये जनतेचे अतोनात नुकसान झाले. त्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा होती, मात्र मदत जाहीर करण्यात आली नाही, असं सांगत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

“ते मला रोज सात सात- आठ आठ तास…”; अनिल देशमुखांनी सांगितला धक्कादायक प्रकार 

“आपण कॅशलेस नाही तर लेसकॅश अर्थव्यवस्था झालोत” 

“एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सूचतात” 

पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 

“कोण नितेश राणे? त्यांच्या आरोपांना आम्ही मोजत नाही”