अमरावती बंदचे हिंसक रुप: आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड

अमरावती | सध्या अमरावतीमधील त्रिपुरा येथे घडलेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर त्या घटनेचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहे. त्यामुळे सध्या अमरावतीतील वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे.

त्रिपुरा येथे घडलेल्या घडनेमुळे सध्या महाराष्ट्रातील वातावरण तीव्र झालं असून याच पार्श्वभूमीवर आता अमरावती बंद पुकारण्यात आला. या घटनेमुळे राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन आणि मोर्चे काढले जात आहे. सगळीकडे तणावपूर्ण वातवरण असतानाच आता अमरावतीमध्ये हिंसक रुप पहायला मिळालं.

अमरावतीमध्ये सुरु असलेल्या आंदोलनात आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड झाली. याशिवाय आंदोलकांकडून दगडफेकही करण्यात आली. त्यामुळे आता आंदोलनाला रोखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला.

अमरावतीतील आंदोलन रोखण्यासाठी बंदोबस्त केलेल्या पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार करायला सुरुवात केली. त्यामुळे अमरावतीमध्ये आता याचाच निषेध म्हणून आज अमरावती शहर बंदचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे वतीनं करण्यात आलं.

त्रिपुरा घटनेनं निर्माण झालेल्या हिंसक वातावरणाला आटोक्यात आणण्यासाठी आता अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या जनतेने अशा राजकारणाला बळी पडू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता राखावी, असं आवाहन केलं आहे.

अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्य राखीव पोलीस दलही चौकाचौकात तैनात करण्यात आलं आहे. मात्र हा मोर्चा काही आटोक्यात येताना दिसत नाही.

आंदोलकांचा आक्रोश पाहता अमरावत दुपारी चार वाजेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याची विनंती भाजपनं केली आहे. राज्यात शांतता ठेवण्यासाठी विनाकारण सामजिक द्वेष वाढेल, अशी कृती कोणाकडूनही होऊ नये, असं गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  ’50 रुपयांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करायचे असतील तर…’; संजय राऊत यांनी सूचवला पर्याय

  “शिवसेनेनं कधीही मुस्लिमांना विरोध केला नाही, ते आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत”

  “महाराष्ट्रात दंगली करणाऱ्या रझा अकादमीवर बंदी घाला, अन्यथा…”

“आपण कॅशलेस नाही तर लेसकॅश अर्थव्यवस्था झालोत” 

“एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सूचतात”