“गेल्या तीस वर्षात तुम्हाला राष्ट्रावादीचा मुख्यमंत्रीही बसवता आला नाही”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबादमध्ये आपण म्हतारा झालो म्हणून मी अजून थकलेलो नाही, तुमची साथ असेपर्यंत हा गाडा सुरूच राहील असं व्यक्तव्य केलं होतं.

शरद पवार यांच्या याच व्यक्तव्यावर गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले की, शरद पवार यांचे कालचे भाषण ऐकून मी अवाक झालो, पडळकर म्हणालेत.

एकीकडे ते आपल्या वयाच्या थोरल्यापणाची मानाची अपेक्षा ठेवतात आणि दुसरीकडे वैराग्याच्या काळातही बगल में छुरी घेऊन फिरतात. काल त्यांना पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात आमंत्रित न मिळ्यामुळे हताश होऊन ते बोलले असतील, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर यांचा राग यामुळेच आहे कारण माझ्यासारखा धनगराचा पोरगा असो की, शेतकऱ्यांचा सुपुत्र सदाभाऊ खोत असो की वंचितांचा पुत्र राम सातपुते असो यांना देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेच्या प्रवाहात पुढे आणलं, असं पडळकरांनी सांगितलं.

या महाराष्ट्रील प्रस्थापितांचा तीळपापड होत आहे. म्हणूनच आमचे बहुजन हितचिंतक देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेत खुपतात, अशी टीका पडळकरांनी शरद पवारांवर केली आहे.

दरम्यान, आपण म्हणता मी पुन्हा येऊ देणार नाही. पण तुमच्या पक्ष स्थापनेपासून गेल्या तीस वर्षात तुम्हाला आजपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रावादीचा मुख्यमंत्रीही बसवता आला नाही. सत्तेसाठी पडती भूमिका घेणं सोपं असतं पण लोकहितासाठी सक्षम भूमिका घेणं कठीण असतं, असं आमदार गोपीचंद पडळकरांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

रशियन सैनिकाच्या कृत्याने खळबळ; युक्रेनमधून अत्यंत धक्कादायक माहिती समोर 

काळीज पिळवटून टाकणारा अपघात; बाईकला ट्रकची धडक, आठ महिन्यांच्या बाळाचा जागीच मृत्यू 

केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना मोठा झटका?; ‘या’ वस्तूंवरील GST वाढणार 

“24 तास पोलिसांना सुट्टी द्या, मग बघा आम्ही कुठे कुठे चप्पल घालतो…” 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; सरकार हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत