रशियन सैनिकाच्या कृत्याने खळबळ; युक्रेनमधून अत्यंत धक्कादायक माहिती समोर

किव | आज रशिया-युक्रेन युद्धाचा 11 वा दिवस आहे. रशियन सैनिक युक्रेनच्या शहरांवर क्षेपणास्त्रे डागत आहेत. दोन्ही देश नुकसानीबाबत अनेक प्रकारचे दावे करत आहेत.

रशियन सैनिक महिलांवर बलात्कार करत असल्याचा दावा युक्रेनच्या एका महिलेने केला आहे. यापूर्वी युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबा यांनीही रशियन सैनिकांवर युक्रेनच्या महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप केला होता.

खेरसनमध्ये राहणाऱ्या स्वेतलाना झोरिना यांनी सीएनएनला शहरातील बिकट परिस्थिती आणि महिलांवरील अत्याचाराबाबत सांगितलं आहे. त्यांनी महिला आणि मुलींवर बलात्कार करण्यास सुरुवात केली आहे, असंही त्या म्हणाल्यात.

लोक घाबरले आहेत. प्रत्येकजण आपापल्या घरात स्वतःला सुरक्षित ठेवत आहे. आम्ही घाबरलो आहोत, पण आम्ही हार मानणार नाही. रशियाचा ताबा असूनही, खेरसन हे युक्रेनियन शहर आहे आणि आम्हाला येथे राहायचं आहे. आता आम्ही बाहेर पडायला घाबरतो, पण आमचा आमच्या सैन्यावर विश्वास आहे आणि विजयाचा विश्वास आहे, असं त्यांनी म्हटलंय.

हा प्रकार एका 17 वर्षीय मुलीसोबत घडला. तिच्यावर बलात्कार झाला आणि नंतर त्यांनी तिची हत्या केली. मात्र, या दाव्यांची अद्याप पुष्टी झालेली नाही.

दरम्यान,रशियन सैन्यानं 24 फेब्रुवारीपासून युक्रेनवर हल्ला सुरु केला आहे. रशियानं यापूर्वी यूक्रेनला घेरण्याची तयारी सुरु केली होती. यावर यूक्रेन वारंवार चिंता व्यक्त केली होती.

युद्धाच्या दहा दिवसांमध्ये दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरु झाल्या होत्या. त्या चर्चेअंती दोन्ही देशांनी युद्धविरामावर शिक्कामोर्तब केलं आहे. यूक्रेनमध्ये अडकलेले परकीय नागरिक सुरक्षितपणे बाहेर पडावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यूक्रेननं ला नाटोनं नो फ्लाय झोन करता नकार दिला होता. यानंतर यूक्रेननं त्याचा निषेध नोंदवला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

काळीज पिळवटून टाकणारा अपघात; बाईकला ट्रकची धडक, आठ महिन्यांच्या बाळाचा जागीच मृत्यू 

केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना मोठा झटका?; ‘या’ वस्तूंवरील GST वाढणार 

“24 तास पोलिसांना सुट्टी द्या, मग बघा आम्ही कुठे कुठे चप्पल घालतो…” 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; सरकार हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 

“बाळासाहेबांनतर हिंदूह्रदयसम्राट पदवी देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावी”