मुंबई | आज 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिन… पर्यावरण दिनाच्यानिमित्ताने विविध माध्यमातून पर्यावरणाचं संवर्धन करण्याची जनजागृती होत असते. तसंच दिवसेंदिवस झाडे वाढली पाहिजेत, यासाठी वृक्षारोपण झालं पाहिजे, असा आग्रह होत असतो. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फक्त जनजागृती संदेश न देता त्यांनी कृती करून समाजाला संदेश दिला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज राजभवन येथे चाफ्याचे रोप लावले. प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण संवर्धनासाठी किमान एक रोप लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन राज्यपालांनी केले आहे.
प्रत्येकाने निसर्ग संवर्धनाची भावना मनात ठेऊन त्यादृष्टीने पर्यावरणासाठी काम करणे आवश्यक आहे. आपण तश्या पद्धतीने जर काम केलं तरच निसर्गाचा योग्य समातोल राखला जाईल, असं राज्यपाल म्हणाले.
दुसरीकडे कोरोनाचं संकट संपूर्ण जगावर घोंघावत असताना देखील आज विविध माध्यमातून संपूर्ण जगभरामध्ये जगातिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन न करता पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्याचे आवाहन आज होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-…म्हणून भाजपच्या ‘या’ महिला आमदाराविरोधात गुन्हा दाखल
-…अन्यथा शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होणार; राज्य सरकारचा नवा आदेश
-योगी आदित्यनाथांच्या वाढदिवसाला संजय राऊतांनी दिल्या अनोख्या शुभेच्छा
-अशाप्रकारे ‘या’ शिक्षिकेनं 13 महिन्यात कमावले 1 कोटी रुपये वेतन
-अडचणीच्या काळात काँग्रेसला आणखी एक धक्का; ‘या’ आमदारानं सोडली साथ