तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; परीक्षेशिवाय ‘इतक्या’ जागा भरणार

नवी दिल्ली | भारतीय रेल्वेमध्ये नोकरी (Job) शोधत असलेल्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. यासाठी नॉर्थ फ्रंटियर रेल्वे (NFR) ने अप्रेंटिसची पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत.

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार NFR च्या अधिकृत वेबसाइट nfr.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून आहे.

उमेदवार https://rrcnfr.in/actaprt22nfr/gen_instructions या लिंकद्वारे या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तुम्ही अधिकृत अधिसूचना देखील तपासू शकता. या भरती (रेल्वे भर्ती 2022) प्रक्रियेअंतर्गत एकूण 5636 रिक्त पदे भरली जातील.

उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह 10वी किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) उत्तीर्ण केलेलं असावं. तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI असणं आवश्यक आहे.

उमेदवारांची वयोमर्यादा 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावी. तसेच निवड तयार केलेल्या गुणवत्ता यादीवर आधारित असेल, अशी माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“हातात ईडी येण्यासाठी लोकसभेची सत्ता असावी लागते, तुम्हाला तर…”

“महाविकास आघाडीला विधानपरिषद निवडणुकीत मोठं खिंडार पडेल” 

15 जूनपर्यंत ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार; हवामान खात्याकडून अलर्ट जारी 

कराडमध्ये शेट्टी-महाडिकांची गळाभेट ; महाडिक राजू शेट्टींच्या रस्त्यातच पाया पडले 

महाविकास आघाडीत वादाची ठिणगी?; पराभवानंतर शिवसेना ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता