“हातात ईडी येण्यासाठी लोकसभेची सत्ता असावी लागते, तुम्हाला तर…”

मुंबई | हातात ईडी येण्यासाठी लोकसभेची सत्ता असावी लागते. तुम्हाला राज्यसभेचा खासदार निवडून आणता येत नाही, असा टोला भाजप (Bjp) नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तुमचे आठ आमदार फुटतात. तुमची विश्वासहार्यता आहे कुठे? तुमचे आमदार तुम्ही टिकवू शकत नाही आणि बढाया मारता. आमची मते पाहिली तर तुमच्यापेक्षा जास्त आहेत. तुम्ही अल्पमतात आला आहात, असा राणे यांनी हल्लाबोल केला.

राज्यसभेच्या तीन जागा जिंकणार सांगत होते, काय झालं? राऊतही एका मताने आले. काठावर आले. आघाडीची मते त्यांना मिळायला हवी होती. ते सत्तेत आहेत. सत्तेसाठी 145 मते लागतात. तुम्ही अल्पमतात आले आहात. तुम्ही राजीनामा द्या. नैतिकतेचं भान असेल तर राजीनामा द्या बाजूला व्हा, असं नारायण राणे म्हणाले.

जी भाषा वापरायला नको होती, ती वापरल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यातच नव्हे, तर देशात बेअब्रूही झाली. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला, हे दुर्दैव आम्ही समजतो, अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

मुख्यमंत्री विरोधकांना ज्या भाषेत बोलतात ती संसदीय नाही. शिवसेना सांगत होती की, सर्व जागा जिंकणार. काय झालं. संजय राऊतच काठावर आलेत. वाचलेत आमच्या हातातून. त्यांना आघाडीची मतं मिळायला हवी होती. तितकीही मते त्यांना मिळाली नाहीत, असं राणे म्हणाले.

तुम्ही महाराष्ट्राला 10 वर्ष मागे नेलं आहे. त्याचबरोबर सत्तारुढ आणि विरोधकातील संबंध धुळीला मिळवले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना सत्तेत राहायचा नैतिक अधिकार नाही, असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

“महाविकास आघाडीला विधानपरिषद निवडणुकीत मोठं खिंडार पडेल” 

15 जूनपर्यंत ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार; हवामान खात्याकडून अलर्ट जारी 

कराडमध्ये शेट्टी-महाडिकांची गळाभेट ; महाडिक राजू शेट्टींच्या रस्त्यातच पाया पडले 

महाविकास आघाडीत वादाची ठिणगी?; पराभवानंतर शिवसेना ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता 

“असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला, हे आम्ही आमचं दुर्दैव समजतो”