Government security to Manoj Jarange Patil l मराठा आंदोलक व भारतात सध्याच्या घडीला सर्वात चर्चेत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे आपल्या सर्वांनाच माहिती आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच लावून धरला असून ते एवढ्यावरच थांबले नसून त्यांनी काही आठवड्यांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पदयात्रा देखील काढली होती. त्यावेळी राज्यातील शिंदे सरकारने त्यांच्या सर्व मागण्याही मान्य केल्याचे सांगण्यात आले होते. परंतु आता शिंदे सरकारने मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याचा आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
पण राज्य सरकारने जरांगे पाटलांना अचानक सरकारी सुरक्षा का दिली याबाबत अजूनही सर्वत्र चर्चा सुरु असल्याचे सांगण्यात येते. परंतु याबाबत आता कारण समोर आले आहे त्याबाबत थोडक्यात आपण या बातमी मध्ये जाणून घेऊयात.. (Manoj Jarange)
Manoj Jarange l जरांगे पाटलांना सुरक्षा देण्यामागील कारण काय?
Government security to Manoj Jarange Patil l राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशाने जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना आजपासून सुरक्षेसाठी 24तास दोन सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.याबाबतची मागणी सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार आजपासून जरांगे पाटील यांच्या सोबत दोन कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी नेमण्यात आले आहेत. (Government security to Manoj Jarange Patil)
Government security to Manoj Jarange Patil l दरम्यान, जरांगे यांच्या मराठा समाज्याच्या मागण्या मान्य झाल्या असल्याचे सांगतले असले तरी देखील रायगडावरून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांनी 10 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार असल्याचं सांगतले आहे. तसेच राज्य सरकारकडून दोन वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मांडल्या जात आहेत, असा आरोप देखील मनोज जरांगे यांनी केला आहे.
एवढेच नाही तर तुम्ही एकीकडे सगळ्यांनी मिळून सग्या सोयऱ्यांबाबतचा अध्यादेश आणायचा आणि ओबीसींना केंद्रापर्यंत जाऊ असं सांगायचं, या दोन भूमिका का? असा सवाल मनोज जरांगे यांनी विचारला आहे.
News Title : Government security to Manoj Jarange Patil
महत्वाच्या बातम्या –
Business Idea l तुम्ही स्वतःचा हा व्यवसाय सुरू करा आणि बक्कळ पैसा कमवा
NIACL Bharti 2024 l सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! या विभागात सहाय्यक पदांसाठी भरती जाहीर
Today Horoscope l आजचे राशिभविष्य! या राशीचे रखडलेली जमिनीची कामे मार्गी लागतील
T20 World Cup 2024 l बापरे! T-20 विश्वचषकातील IND Vs PAK सामन्याच्या तिकिटांची किंमत ऐकून व्हाल थक्क