“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवा”

मुंंबई | लोकशाहीवरचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर राष्ट्रपती आणि राज्यपाल या पदावरील व्यक्ती निष्पक्ष असावी. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असून भाजपचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळं भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवावं, अशी मागणी मराठी एकीकरण समितीनं केली आहे.

मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख, प्रदीप सामंत आदी प्रमुखांनी एकूणच सत्ता स्थापनेसाठी घडलेल्या प्रकाराचा निषेध करत भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्रातील एकूणच राजकीय घडामोडी आणि सत्ता स्थापनेचा प्रकार पाहता मूळचे भाजपचे असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आता या सर्व समस्यांना कारणीभूत ठरवलं जात आहे.

दरम्यान, भाजपनं सरकार स्थापन करून सर्वांना चकित केलं. या घटनेनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं थेट सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. या याचिकेवर काल सुनावणी झाली असून, आज सत्तास्थापनेच्या निर्णयासंदर्भातील कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली. यावर युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं निर्णय राखून ठेवला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-