सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना दिलासा

मुंबई | 70 हजार कोटी रूपयांच्या कथित सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना याप्रकरणी क्लिनचीट दिली आहे.

सिंचन घोटळ्यातील जवळपास 9 प्रकरणाची चौकशी बंद करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आले आहेत. यामुळे अजित पवारांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

जलसंपदा मंत्री असताना अजित पवारांनी सर्व नियमांना फाटा देत फक्त नऊ महिन्यात तब्बल 20 हजार कोटी रूपयांच्या वाढीव खर्चाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली. महिन्यांच्या हिशेबानुसार, जुलै ते ऑगस्ट या तीन महिन्यातच 32 प्रकल्पांना मंजुरी मिळाली. हे प्रकल्प मंजूर करण्यासाठी व्हीआयडीसीच्या सुकाणू समितीचीही संमती घेण्यात आली नसल्याचा आरोप आहे.

23 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिल्यानेच त्यांना हा दिलासा मिळाल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-