“राज्यपालांनी माफी मागावी, खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला…”

मुंबई | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यावरून सध्या राज्यात वाद पेटल्याचं पहायला मिळतंय.

‘चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कोण पुछेगा और समर्थ के बिना शिवाजी को कोण पुछेगा’, असं राज्यपाल कोश्यारी एका कार्यक्रमात म्हणाले होते.

रविवारी औरंगाबादमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत ट्विट केलं आहे.

खरा इतिहास माहीत करून न घेता आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

असं होत असताना गप्प बसणं हे त्याहून अधिक निषेधार्ह असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी राज्यपालांनी माफी मागावी, असंही म्हटलंय.

राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून, सर्वांना सोबत घेत आदर्श राज्यकारभार केला. सर्वसामान्य जनतेचं हित, हीच त्यांची निती आणि शिकवण होती. असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, खोटा इतिहास सांगून थोर महापुरुषांचा खरा इतिहास पुसण्याचे प्रयत्न देशात इतरत्र यशस्वी होत असतीलही, परंतु महाराष्ट्रात असले प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, हे सर्वांनीच लक्षात ठेवावं, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“30 हजारांमधून फक्त 900 विद्यार्थी युक्रेनमधून आणलेत, फार मोठा तीर नाय मारला”

“…त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, मुख्यमंत्री अजून किती दिवस हे सहन करायचं” 

“…तर धैर्यवर्धन पुंडकरांच्या घरासमोर हात कलम करेन”

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मोदी सरकार लवकरच ‘हा’ निर्णय घेणार 

“अजूनही वेळ गेली नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विचार करावा”