“30 हजारांमधून फक्त 900 विद्यार्थी युक्रेनमधून आणलेत, फार मोठा तीर नाय मारला”

मुंबई | रशिया-युक्रेन युद्धामुळं सध्या सर्व जग चिंतेत आहे. युक्रेनमध्ये रशियन सैन्य सातत्यानं आपली कारवाई वाढवत आहे. तिन्ही दलांमधील लाखो सैनिक सध्या युक्रेनच्या शहरांमध्ये भिषण युद्ध लढत आहेत.

कसल्याही परिस्थितीत युक्रेनवर ताबा मिळवण्याच्या विचारानं सध्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन युद्ध करत आहेत. पुतिन सध्या कसल्याही जागतिक दबावाचा विचार करताना दिसत नाहीत.

युक्रेनमध्ये युद्ध पेटल्यानं तिथं शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यावर पोलंड सिमेवर गैरप्रकार घडल्यानं देशात राजकारण तापलं आहे.

नरेंद्र मोदी सरकारनं वेळीच विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी उपाय केले असते तर विद्यार्थ्यांना असा त्रास सहन करावा लागला नसता, असं विरोधी पक्ष आणि विद्यार्थ्यांचे पालक म्हणत आहेत.

युक्रेनमधील काही विद्यार्थ्यांना घेवून भारतीय विमान देशात दाखल झाल्यानंतर केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य सिंधीया आणि पियुष गोयल यांनी सरकारची प्रसिद्धी केल्याची टीका त्यांच्यावर होत आहे.

युक्रेनमध्ये 30 हजार विद्यार्थी अडकले आहेत त्यातील फक्त 900 जणांना सरकारनं मायदेशी आणलं आहे. केंद्र सरकारनं कोणताही तीर मारला नाही, अशी टीका राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

युक्रेनमधील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मोदी सरकारनं ऑपरेशन गंगा या मोहिमेला सुरूवात केली आहे. मोहिमेच्या नावावरूनही देशात राजकारण पेटलं आहे. सरकार फक्त प्रसिद्धी करत असल्याची टीका काॅंग्रेसनं केली आहे.

दरम्यान, पोलंड सिमेवर भारतीय विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या गैरप्रकारामुळं केंद्र सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे. भारत सरकारनं पोलंड आणि युक्रेन सरकारशी बोलून मदत करण्याचं आवाहन करण्याची विनंती करावी अशी मागणी विरोधक करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“…त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, मुख्यमंत्री अजून किती दिवस हे सहन करायचं” 

“…तर धैर्यवर्धन पुंडकरांच्या घरासमोर हात कलम करेन”

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मोदी सरकार लवकरच ‘हा’ निर्णय घेणार 

“अजूनही वेळ गेली नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विचार करावा” 

समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?- भगतसिंह कोश्यारी