‘‘दादा, कुछ तो गडबड है!; पवारांच्या राजीनाम्यावर सामनातून बोचरी टीका

मुंबई :  शिखर बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला. त्यामुळे व्यथित होऊन राजीनामा दिला” असं राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी सांगितलं होतं. अजित पवार यांच्या राजीनामा नाट्यावरून शिवसेनेच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे.

अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावरील आरोपांमुळे व्यथित होऊन राजीनामा दिला असेल, तर त्या संघर्षाच्या दिवशी ते पवारांबरोबर कुठेच दिसले नाहीत. लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. ते पाहिल्यावर वाटते, ‘‘दादा, कुछ तो गडबड है!,’’ असा प्रश्न शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून यावर भाष्य केलं आहे.

शिखर बँक घोटाळ्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. 27 सप्टेंबरला ते जाणार होते. पण, ईडीने चौकशी गरज नसल्याचे सांगितल्यानंतर पवारांनी आपला निर्णय रद्द केला.या घटनेनंतर काही तासांतच अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवार गायब झाले होते.

दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांनी राजीनामा देण्यामागची कारणे पत्रकार परिषदेत सांगितली. मात्र, अजित पवारांच्या राजीनाम्यावरून शिवसेनेने शंका उपस्थित केली आहे. शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून यावर भाष्य केलं आहे.

दरम्यान, शिखर बँक घोटाळ्यात शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्याची घोषणा केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. या नाट्याचं दिग्दर्शन करून सक्त वसुली संचालनालयाने ऐनवेळी शरद पवारांसोबत तह केल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-