“गेल्या वेळेप्रमाणे मला पळायला लावू नका”

सातारा : जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीच मी भाजपसोबत आलो आहे. विधानसभा निवडणुकीतही महायुतीच्या सर्वच उमेदवारांचा जाहीर प्रचार करणार आहे, मात्र मागील निवडणुकीत मला तुम्ही पळायला लावलं तसं या वेळी करू नका, अशा मिश्किल शब्दांत भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी भाजप कार्यकर्त्यांना विनंती केली.

सातारा लोकसभा मतदार संघातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उदयनराजे बोलत होते. ते म्हणाले,की माझ्यावर इतके खटले कसे आहेत, असे मला निवडणूक आयोगाने विचारले होते. यावर मी त्यांना सांगितले होते,की मला अन्याय सहन होत नाही, असं उदयनराजे म्हणाले आहेत.

माझ्याशिवाय दुसरा तुमची कोण काळजी घेणारा असेल तर सांगा, मी त्याचा मुख्य प्रचारक म्हणून काम करतो, असेही ते या वेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले. या वेळी त्यांनी आपण लोकसभा पोटनिवडणुकासाठी, तर शिवेंद्रराजे भोसले विधानसभेसाठी 1 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले.

साताऱ्याचा खासदार हा भाजपचाच व्हावा, ही नियतीची इच्छा होती. विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणूक होऊ नये यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले होते. मात्र, त्यांचे स्वप्न पूर्ण झालेले नाही, शेखर चरेगावकर म्हणाले.

आगामी निवडणूक ही युद्ध म्हणून लढायची आहे. शत्रू पिसाळलेला आहे. लहान पोरासारखं त्यांचं वागणं चालू आहे. आपल्यातील कोणी विरोधात काम केलं तर पायात दगड बांधून त्याला पाण्यात सोडलं जाईल. आम्ही त्यांच्याकडे पुन्हा पाहणार नाही, असं विक्रम पावस्कर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-